Sanjay Raut : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात, आता पुढे काय?

संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न विचारला जातोय. त्याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Sanjay Raut : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात, आता पुढे काय?
संजय राऊत, खासदार, शिवसेनाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 4:51 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतलंय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज सकाळी 7 वाजता ईडीचं (Enforcement Directorate) पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं. त्यानंतर तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने दुपारी साडे तीनच्या सुमारास संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. आता काही वेळातच संजय राऊत यांना ईडी कार्यालयात (ED Office) नेलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न विचारला जातोय. त्याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय?

उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, ज्यावेळी ईडी एखाद्या व्यक्तीला अटक करत असते, तेव्हा ईडीकडे त्या व्यक्तीविरोधात सकृतदर्शनी पुरावा असतो. ईडीच्या कारवाईत नेहमी तोंडी पुरावा नसतो, तर तो कागदोपत्री पुरावा असतो. त्या कागदोपत्री पुराव्या आधारे संबंधित व्यक्तीला स्पष्टीकरण करता आलं नाही तर मात्र ईडी कारवाई करुन त्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकते. किंवा त्या वक्तीने ईडीच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत, तसंच दिलेली उत्तरं समाधानकारक नसतील तर ईडी त्या वक्तीला ताब्यात घेऊ शकते. त्यानंतर पीएमएलए कायद्यानुसार त्या व्यक्तीला ईडीच्या विशेष कोर्टासमोर हजर करावं लागतं आणि मग तिथे ईडी कोठडी मागितली जाऊ शकते. तिथे ईडी कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी हे दोन प्रकार त्यांना मिळू शकतात. अर्थात हा न्यायाधीशांपुढे पुरावा सादर करावा लागतो आणि त्यानुसार ईडी कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते, अशी माहिती निकम यांनी दिलीय.

संजय राऊतांची आक्रमकता नडली?

संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत कायम ताठर भूमिका घेतलेली आहे. शिवाय त्यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पत्राचाळीतील जागेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना 1 जुलै रोजी नोटीस बजावली होती. तेव्हापासून सुरु असलेली प्रक्रिया आता थेट घरापर्यंत येऊन ठेपली आहे. एकीककडे घरात त्यांच्यासह कुटुंबियांची चौकशी सुरु असताना दुसरीकडे फ्लॅटवरही अधिकारी पोहचल्याने नेमकी काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. या फ्लॅट खरेदीसाठी वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच याची चौकशी सुरु झाली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.