तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Nov 23, 2022 | 11:28 AM

महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वात मिंधे सरकार आहे. कुणाला मुंबई तोडायची आहे. तर कुणाला महाराष्ट्रातील गावं तोडायची आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरततडण्याचं काम गेल्या साडेतीन महिन्यांपासून जोरात सुरू आहे.

तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय समिती स्थापन केलेली असतानाच कर्नाटकाने महाराष्ट्राच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितला आहे. जत हा कर्नाटकाचा भाग असल्याचा दावा त्यांनी केल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकात भाजप सरकार असूनही भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीकडून खोड्या काढल्या जात असल्याने राज्यातील विरोधी पक्षांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर अत्यंत कडक भाषेत टीका केली आहे.

ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आलेलं आहे, त्यामुळे देशातील अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटतं आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो. शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. मुख्यमंत्री त्यावर काही बोलत नाही. या प्रकाराचं उपमुख्यमंत्री समर्थन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्याराज्याचे हस्तक राहणार नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात अत्यंत कमजोर हतबल सरकार आहे, त्यामुळे वाद निर्माण होत आहे. त्यांना महाराष्ट्र माहीत नाही. महाराष्ट्र समजला नाही. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सीमाबांधवाच्या कोणत्या प्रश्नाला वाचा फोडली? ते त्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. लगेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याने जतवर दावा सांगितला. कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं सरकार आहे.

महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वात मिंधे सरकार आहे. कुणाला मुंबई तोडायची आहे. तर कुणाला महाराष्ट्रातील गावं तोडायची आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरततडण्याचं काम गेल्या साडेतीन महिन्यांपासून जोरात सुरू आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. गुवाहाटीवरून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं, अशी टीका त्यांनी केली.