फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; संजय राऊतांचा टोला

102व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. (sanjay raut)

फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; संजय राऊतांचा टोला
sanjay raut
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 11:22 AM

नवी दिल्ली: 102व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (sanjay raut taunt devendra fadnavis over 102 amendment bill)

आज संसदेत 102व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. त्याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला. आरक्षणाबाबतची अपवादात्मक परिस्थिती आहेच. त्याबाबत काय करायचं हे राज्य ठरवेल. त्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत. आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो. काही वकिली सल्ला लागला तर सरकार नक्कीच त्यांचा सल्ला घेईल. हा काही राजकीय मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे, असं राऊत म्हणाले.

विधेयकातील त्रुटी दाखवू

राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिला तरी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याने वाढवता येणार नाही. त्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही राज्य आरक्षण देऊ शकेल की नाही याची शंका आहे. तरीही केंद्र सरकारने जे पाऊल टाकलं त्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यावर लोकसभेत चर्चा होईल. उद्या राज्यसभेत येईल. आम्ही पूर्णपणे या जनतेच्या हिताच्या बिलाला पाठिंबा देत आहोत, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. या विधेयकावर आम्ही मते मांडू. त्रुटीही दाखवू. आम्हाला बिल लांबवायचं नाही. जे आहे ते आम्ही स्वीकारू. त्यातील त्रुटी संदर्भात केंद्राने पाऊल उचलावं अशी विनंती करू. मराठा समाजाचा जो रेटा आहे, त्यातून मार्ग काढावा लागेल. याक्षणी सरकारने आम्हाला एक खाऊचा डबा दिला आहे. पण तो डबा रिकामा आहे, अशी टीका त्यांनी केली.

जनता 2024ची वाट पाहतेय

राज्यातील भाजपचे नेते दिल्लीत आहेत. काल या भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय झाला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोर्चेबांधणी हे शब्द बोलायला सोपे आहेत. आमची मोर्चेबांधणी आणि आमची तटबंदी काय आहे याची कल्पना त्यांना आहे, असा टोला त्यांनी लगावला. जनता 2024 च्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यावेळी जनता कुणाला आशीर्वाद देणार ते दिसेलच, असंही ते म्हणाले. (sanjay raut taunt devendra fadnavis over 102 amendment bill)

 

संबंधित बातम्या:

एसईबीसी आरक्षण: राज्यांना अधिकार दिल्यास काय परिणाम होणार?; वाचा सविस्तर

BIG News:मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा झटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली

102 व्या घटना दुरुस्तीचा चुकीचा अर्थ काढला जातोय, केंद्राच्या फेरविचार याचिकेबद्दल आभार : देवेंद्र फडणवीस

(sanjay raut taunt devendra fadnavis over 102 amendment bill)