Sanjay Raut ED : ‘तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य’ ट्वीट करत राऊत म्हणाले, ईडी चौकशीला जाणार

| Updated on: Jul 01, 2022 | 7:41 AM

Sanjay Raut ED News : यापूर्वी संजय राऊत हे 28 जूनला ईडीसमोर हजर होणार होते. मात्र राऊत त्यांनी ईडीला पत्र लिहून हजर राहण्यासाठी वकिलांमार्फत आणखी वेळ मागितला होता.

Sanjay Raut ED : तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य ट्वीट करत राऊत म्हणाले, ईडी चौकशीला जाणार
Sanjay Raut ED : 'तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य' ट्वीट करत राऊत म्हणाले, ईडी चौकशीला जाणार
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – संजय राऊत (Sanjay Raut) हे आज ईडी (ED) कार्यालयात दुपारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहे. तसेच त्यांनी “मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. काळजी करू नका.” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर रहावे अशी त्यांना नोटीस आली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वकीलामार्फत कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. आज सकाळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी काही दिवसांपासून वेगवान पद्धतीने घडत आहेत. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील अनेकांचे डोळे राजकीय घडामोडीकडे लागून राहिलेले आहेत. मी शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो असं देखील त्यांना ट्विट म्हटलं आहे. आज दुपारी त्यांची चौकशी झाल्यानंतर नेमकं काय होणार याकडे त्याच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी वेळ मागितली होती

यापूर्वी संजय राऊत हे 28 जूनला ईडीसमोर हजर होणार होते. मात्र राऊत त्यांनी ईडीला पत्र लिहून हजर राहण्यासाठी वकिलांमार्फत आणखी वेळ मागितला होता. ईडीने त्याला दुसरे समन्स बजावून आज 1 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. संजय राऊत यांनी 7 जुलैपर्यंत मुदत मागितली होती. मात्र ईडीने आणखी वेळ देण्यास नकार दिला असल्याची मा्हिती मिळाली आहे. “मी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाईन, काही लोकांना आम्हाला तुरुंगात पाठवून राज्य चालवायचे आहे. जसे आणीबाणीच्या काळात घडले होते. माझे काम पूर्ण करून मी ईडीसमोर हजर होणार आहे. मी खासदार आहे. मला कायदा माहीत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्या तरी मी कायद्याचे पालन करणारी व्यक्ती आहे” असं संजय राऊत म्हणाले होते.

शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत टार्गेट वारंवार टार्गेट केलं जातंय असं ओरड महाराष्ट्रातील नेते म्हणतं आहे. परंतु आता महाराष्ट्रात सत्ताबदल झाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात आहेत. आणखी जणांची चौकशी लागणार असल्याचे भाजपाचे नेते वारंवार सांगत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात सरकार जाताच राष्ट्रवादीच्या अडचणीतही वाढ झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळाली आहे.