Sanjay Raut : राजकीय नाट्यावर पडदा, संजय राऊतांसमोर नवे संकट, ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जाण्याचे संकेत

गोरेगाव जमिन घोटाळा प्रकरणी खा. संजय राऊत यांना सोमवारी ईडी कार्यालयाकडून चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पुर्वनियोजित राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत आपण हजर राहू शकणार नाही. शिवाय आपल्याला मुतदवाढ द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ईडी कडून त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Sanjay Raut : राजकीय नाट्यावर पडदा, संजय राऊतांसमोर नवे संकट, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचे संकेत
खा. संजय राऊत
| Updated on: Jun 30, 2022 | 11:05 AM

मुंबई :  (Maharashtra Politics) राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाच (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांच्यामागे मात्र, ‘ईडी’ च्या चौकशीची सिसेमिरा लागला आहे. याप्रकरणी आतापर्यंत त्यांना दोन वेळेस नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता शुक्रवारीला चौकशीला सामोरे जाणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत राजकीय कार्यक्रमाचे कारण सांगत आपण चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे राऊतांनी सांगितले होते. पण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता (ED) ईडी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय आपण इतरांसारखे पळून जाणार नाहीतर सामोरे जाणार म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. केवळ ईडी कारवाईच्या भीतीमुळे एकनाथ शिंदे गटात आमदारांची संख्या वाढत असल्याचा आरोप यापूर्वीच संजय राऊत यांनी केला होता.

सलग दोन दिवस नोटीसनंतर राऊतांचा निर्णय

गोरेगाव जमिन घोटाळा प्रकरणी खा. संजय राऊत यांना सोमवारी ईडी कार्यालयाकडून चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पुर्वनियोजित राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत आपण हजर राहू शकणार नाही. शिवाय आपल्याला मुतदवाढ द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ईडी कडून त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी वेळ वाढवून मागून देखील नोटीसांचे सत्र हे सुरुच असल्याने आता शुक्रवारच्या चौकशीत काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.

पळून जाणारा नाही तर लढणारा शिवसैनिक

एकनाथ शिंदे गटातील निम्म्यापेक्षा अधिक आमदार हे केवळ ईडीच्या चौकशीला घाबरुन पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि शिवसेनेबद्दलची एकनिष्ठता समोर आली आहे. त्यामुळे मी पळून जाण्याऱ्यांपैकी नाहीतर लढणारा शिवसैनिक असल्याचे म्हणत राऊतांचे बंडखोरांवर टिकेचे बाण अद्यापही सुरुच आहेत. भाजपाने दाखविलेले आमिष आणि ईडी कारवाईच्या भीतीने या आमदारांनी आपले ईमान विकल्याचा आोरपही राऊतांनी केला आहे.

गोरेगाव जमिन घोटाळा

खा. संजय राऊत यांनी जमिन घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याअनुशंगाने भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर आरोप तर केले होतेच पण आता त्यांना प्रत्यक्ष चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळी कारणे सांगून राऊतांनी वेळ वाढवून घेतली होती. पण आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शुक्रवारी सकळी चौकशीला हजर राहणार आहेत.