राज्यपालांचं चहा-बिस्किट न खाता, का रे… विचारा, भाजप नेत्यांना संजय राऊत यांचं आव्हान

| Updated on: Dec 05, 2022 | 1:05 PM

छत्रपती हे एक राजा जन्माला आले होते, हे तरी आपण स्वीकारताय का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला..

राज्यपालांचं चहा-बिस्किट न खाता, का रे... विचारा, भाजप नेत्यांना संजय राऊत यांचं आव्हान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याऱ्या कर्नाटक सरकारला (Karnataka Government) कारे म्हणण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. तसेच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati shivaji Maharaj) यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना का रे… शिवरायांचा अपमान केला, हे विचारण्याची हिंमत भाजपात नाही, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

राज्यपाल भवनात जाऊन भाजप नेत्याने राज्यपालांचे चहा-बिस्किट न खाता, त्यांना का रे… असा सवाल करून दाखवावा. मनगटात दम असेल तर त्यांना जाब विचारावा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.

तसेच राज्याचं हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबर रोजी सुरु होत आहे. तत्पुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई होणारच, झालीच पाहिजे, असा इशारा राऊत यांनी दिलाय.

तुमच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. रोज उठतात, शिवरायांची बदनामी करतात. शिवरायांचा इतिहास तुडवतात.
छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. अख्ख्या जगाला माहिती. महाराष्ट्रातला बच्चा बच्चा सांगेल. पण काल भाजपने काल शिवनेरीवर फुली मारली, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

इतिहासातून शिवनेरी काढून टाकलं. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातील आहे, हे तरी मान्य आहे का? किंवा छत्रपती हे एक राजा जन्माला आले होते, हे तरी आपण स्वीकारताय का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला.

भाजप आमदार प्रसाद लाड याांनी 4 डिसेंबर रोजी स्वराज्यभूमी कोकण महोत्सव या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं म्हणत महाराजांचं बालपण कसं कोकणात गेलं, यावर त्यांनी बोलताना भर दिला.