AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोळसा खाणीत भीषण स्फोट, 16 मजूर जागीच गाडले गेले; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

मेघालयाच्या पूर्वेला असलेल्या जैतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणीत मोठा स्फोट होऊन १६ मजूरांचा ढीगाऱ्यात गुदमरुन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोळसा खाणीत भीषण स्फोट, 16 मजूर जागीच गाडले गेले; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
A massive explosion in a coal mine.
| Updated on: Feb 05, 2026 | 9:55 PM
Share

मेघालयाल पूर्वीतील जैतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका कोळसा खाणीत मोठा अपघात झाला आहे. या कोळसा खाणी मोठा स्फोट झाल्याने १६ मजूर गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलिस, SDRF ची पथके घटनास्थळी पोहचून रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. ताशखाईच्या या कोळसा खाणीत जेव्हा स्फोट झाला तेव्हा खाणीत अनेक मजूर काम करत होते ते लोक या स्फोटाच्या तावडीत सापडले. आतापर्यंत १६ मजूरांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. खाणीत अनेकजण ढीगाऱ्याखाली दबले असल्याचे म्हटले जात आहे. हे मजूर आसाम येथील राहणारे असल्याचे म्हटले जात आहे.

DGP नोंगरंग यांनी दिली माहिती

ताशखाई येथील कोळसा खान पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. कोयला खाणीत स्फोट झाल्यानंतर गुरुवारी १६ मजूरांचा मृत्यू झाला. मेघालयाचे डीजीपी आई नोंगरंग यांनी सांगितले की ही घटना थांगस्कू विभागात घडली. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. स्थानिक पोलिस-प्रशासन आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाला आहे.

डीजीपी काय म्हणाले ?

घटनास्थळावरुन आतापर्यंत आम्ही १६ मृतदेहांना बाहेर काढले आहे. परंतू बॉम्बस्फोटानंतर खाणीत काम करीत असलेल्या लोकांच्या संख्ये बाबत योग्य माहिती मिळालेली नाहीय.त्यामुळे ढीगाऱ्यातच अनेक लोक अडकून पडल्याचा संशय आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटाच्या कारणांचा अजून पत्ता लागलेला नाही.

‘रॅट-होल’ मायनिंगवर बंदी असूनही….

या अपघाताचा प्रथमदर्शनी अहवाल आला असून ही खाण ‘रॅट-होल’ खाण प्रकारातील असून ती अनधिकृतरित्या सुरु असल्याचे माहीती उघडकीस आली आहे. NGT ने 2014 साली मेघालयात ‘रॅट-होल’ मायनिंगवर कायद्याने बंदी घातलेली आहे. या खाणींमुळे पर्यावरणाचे नुकसान होतेच शिवाय मजूरांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होतो अशी माहिती उघडकीस आली आहे. ‘रॅट-होल’ खाण प्रकारात अरुंद बोगदे खणले जातात, ते तीन ते चार फुट उंचीचे असतात. त्यात मजूरांना उंदरासारखे आत शिरुन कोळसा काढावा लागतो. सुप्रीम कोर्टाने होल मायनिंगवर बंदीला योग्य ठरवले होते.

पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले, मदतनिधी जाहीर केला

या घटनेच मृत झालेल्या मजूरांच्या कुटुबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. मृतांच्या वारसदारांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडातून जाहीर केल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी