AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात या पाच वस्तू ठेवाच घर पैशांनी भरू जाईल, काय सांगतं वास्तुशास्त्र?

अनेकदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो, मात्र हातात पैसा टिकत नाही, घरात आर्थिक स्थिरता नसते, त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात या पाच वस्तू ठेवाच घर पैशांनी भरू जाईल, काय सांगतं वास्तुशास्त्र?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 9:29 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? केवळ या संदर्भातच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर जर तुमच्या घरात सुख, शांती नसेल, हातात पैसा टिकत नसेल, घरात सतत भांडणं होत असतील तर त्यावर देखील विविध उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो, परंतु हातात पैसा टिकत नाही, खर्च वाढतो. कायम पैशांची तंगी जाणवते, तसेच अनेकदा काहीही कारण नसताना घरात सारखी भांडणं होतात, तुम्ही घर कितीही शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील वाद हे होतातच. पत्नी -पत्नीमध्ये सारखी भांडणं होतात. अशा स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे सर्व दोष दूर होतात, अशाच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तुळशीचं झाड – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळशीचं झाडं असतं, त्या घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.

शंख – वास्तुशास्त्रामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात शंख असतो, त्या घराचं सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तिंपासून बचाव होतो, त्यामुळे देवघरात शंख असावाच असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

स्वस्तिक – वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक या चिन्हाला शुभ मानण्यात आलं आहे, त्यामुळे तुमच्या मुख्य घराच्या दरवाजावर स्वस्तिकचं चिन्ह असावं असं वास्तुशास्त्र सांगतं.

पाण्याने भरलेला कलश – घरामध्ये नेहमी पाण्यानं भरलेला कलश असावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

घंटी – तुमच्या देवघरात तांबे किंवा पितळापासून बनवलेली एक तरी घंटी असावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी