AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदी-शहांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरेंनी केलेला मोठा खुलासा काय?

Sunil Tatkare : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

PM मोदी-शहांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरेंनी केलेला मोठा खुलासा काय?
Sunil Tatkare on PM Modi MeetingImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 07, 2026 | 5:04 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. खासकरून दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याबाबत चर्चा सुरू आहे. याच काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आज सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी आणि शहांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले सुनील तटकरे?

सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, संसदेच्या अधिवेशनात आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते. मात्र यावेळी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेत राज्यातील जे प्रश्न आहेत, त्यासंबंधात संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली. या भेटीतून आपल्याला काय न्याय मिळतो का या हेतूने मी जवळपास 10 मंत्र्यांची भेट घेतली.

मोदी-शहांची भेट का घेतली? तटकरेंचा मोठा खुलासा

पुढे बोलताना तटकरे यांनी सांगितले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, ही सदिच्छा आणि मार्गदर्शन अशा प्रकारची भेट होती. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट ही सदिच्छा भेट होती. त्यानंतर प्रामुख्याने मुंबई-गोवा रस्त्याच्या संदर्भात जो प्रश्न कोकणवासियांना भेडसावत आहे त्याबाबत आणि त्या रस्त्यावर असलेला टोलनाक्यांबाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

मुंबई-गोवा महामार्गावरील टोलचा प्रश्न उपस्थित केला – गडकरी

नितीन गडकरींच्या भेटीवेळी असे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की, सरकारचं धोरण 60 किलोमीटरवर टोल असावा, मात्र कोकणात 40 किमीच्या अंतरावर टोल होत आहेत. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देत त्यांनी काही सूचना दिल्या आहेत अशी माहिती यावेळी तटकरे यांनी दिली आहे. आता आगामी काळात गडकरी या रस्त्याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत