Sanjay Raut : शिवसेना काय आहे ते मोदी, शाह, फडवीसांना समजेल – संजय राऊतांचा थेट इशारा

संजय राऊतांनी भाजपवर शिवसेनेत पक्षांतर करण्यासाठी दबाव आणि ब्लॅकमेलिंगचा वापर करण्याचा आरोप केला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देत, राऊतांनी स्पष्ट केले की शिवसेना कोणत्याही प्रकारचा दबाव सहन करणार नाही. पक्षातल्या कोणत्याही गैरकृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

Sanjay Raut : शिवसेना काय आहे ते मोदी, शाह, फडवीसांना समजेल - संजय राऊतांचा थेट इशारा
संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 05, 2025 | 10:43 AM

पक्षातलं आऊटगोईंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या जोरावर, दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं याला आऊटगोईंग-इनकमिंग अशा शब्दांच्या उपमा देऊ नका. 2 तास आमच्याकडे ईडी, सीबीआय, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजप 90 टक्के आऊटगोईंग करेल. याला वैचारिक पक्षांतर वगैरे म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. कोणाला जायचंय, कोणाला थांबायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण पक्षात राहून जर कारवाया कराल तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल, असे राऊतांनी स्पष्ट केले. सुधाकर बडगुजर यांच्यावर काल केलेल्या (पक्षातून हकालपट्टीच्या) कारवाईनंतर संजय राऊत यांचं हे आजचं विधान आणि त्यांनी दिलेला इशारा अतिशय स्पष्ट आहे.

ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही 

बाळासाहेब ठाकरे यांची, मा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. देशाच्या राजकारणातला हा बराच जुना पक्ष आहे.भले अमित शहांनी त्यांचा कंडू शमवण्यासाठी , महाराष्ट्रावर त्यांना जो सूड उगवायचा आहे त्यासाठी शहांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला. पण शिवसेना काय आहे ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. इनकमिंग-आऊटगोईंग किंवा अजून कोणतेही शब्द वापरत असाल तर त्या शब्दांचा वापर जपून करा, पक्षांतर्गत कोणतेही हेवेदावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला.

पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते, त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसांत तसेच स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतरच अशा प्रकारची कारवाई केली जाते असे सांगत बडगुजर यांच्यावरील (निलंबनाच्या) कारवाईबद्दल अधिक बोलण्यास राऊतांनी नकार दिला. चुकीचं काम आमच्याकडून होत नाही, असंही ते म्हणाले. मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष हेच धोरण शिवसेनेत कधीच राबवलं जात नाही असंही राऊत म्हणाले.