Sanjay Raut : मुंबईच्या विक्रोळी परिसरात संजय राऊतांच्या बॅनरची विटंबना, पोलिसांनी बॅनर केला जप्त

मागील अनेक दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मिळून घोटाळा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी त्यांना माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा असं म्हटलं होतं.

Sanjay Raut : मुंबईच्या विक्रोळी परिसरात संजय राऊतांच्या बॅनरची विटंबना, पोलिसांनी बॅनर केला जप्त
मुंबईच्या विक्रोळी परिसरात संजय राऊतांच्या बॅनरची विटंबना
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 7:23 AM

मुंबई – मागील अनेक दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मिळून घोटाळा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी त्यांना माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा असं म्हटलं होतं. रात्री विक्रोळी परिसरात संजय राऊत यांच्या बॅनरची विटंबना करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या बॅनरबरती गधा हा शब्द लिहीण्यात आला आहे. तसेच संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर चप्पल लावली आहे. कुत्र्याचा फोटो आणि पक्षाची लाज काढणारा नेता, शिवसेनेचं खाऊन शरद पवारांचे (Sharad Pawar) गोडवे गाणारा नेता, झाकणझुल्या अशा खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. याबाबत सुर्यानगर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली आहे. आशय लिहीलेला बॅनर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ज्याने हा आशय लिहिला त्याचा तपास पोलिस करीत आहेत.

नेमक काय आहे प्रकरण

विक्रोळी परिसरात ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा योध्दा आशयाचा शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आला होता. त्यावर एका अज्ञात व्यक्तीकडून गधा नावाचा आशय लिहीला आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या चेहऱ्याच्या जवळ चप्पल काढली आहे. कुत्र्याचा फोटो आणि पक्षाची लाज काढणारा नेता असा आशय अधिक ठळक अक्षरात लिहीण्यात आला आहे. अत्यंत खालच्या दर्जाचा आशय लिहिल्याचे काही शिवसैनिकांच्या लक्षात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. झालेला सगळा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित बॅनर ताब्यात घेतला आहे. आशय लिहिणाऱ्या व्यक्तीचा पोलिस तपास करीत आहे.

टॉम्बे पोलिस ठाण्यात किरीट सोमय्या विरोधात गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आहे. तसेच त्या पैशांचा वापर कुठे-कुठे केला आहे हे सांगितले. पण किरीट सोमय्यांनी माझ्याविरोधात केलेल्या तक्रारीचा एक सुध्दा कागद त्यांच्याकडे नसल्याचे म्हटले आहे. सध्या किरीट सोमय्या दिल्लीत असून आता हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचे म्हणाले आहेत.

Nagpur Shiv Sena | वरुण सरदेसाईंचा दावा फोल, शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर, दोघांच्या नेतृत्वात दोन आंदोलनं

आज महाअष्टमीच्या दिवशी होणार महागौरीची पूजा, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका; आरबीआयची अ‍ॅक्सिस, आयडीबीआय बँकेवर कारवाई