कोल्हापूर उत्तरची जागा बिनविरोध होणार? बंटी पाटलांनी काय फिल्डिंग लावली? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 24, 2022 | 8:03 PM

कोल्हापूर उत्तर विधानसभेची (North Kolhapur) जागा बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटणार असल्याची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.

कोल्हापूर उत्तरची जागा बिनविरोध होणार? बंटी पाटलांनी काय फिल्डिंग लावली? वाचा सविस्तर
सतेज पाटील, काँग्रेस नेते
Follow us on

कोल्हापूर : गेल्या विधान परिषदेवेळी कोल्हापुरात साटलोटं करत कोल्हापूर विधान परिषद सतेज पाटलांनी (Satej patil) बिनविरोध करून दाखवली आणि आता हाच प्लॅन सतेज पाटलांकडून पुन्हा आखण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची (North Kolhapur) जागा बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटणार असल्याची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी ही चर्चा करणार असेही पाटील म्हणाले आहेत. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामळे येत्या आठवड्यात या जागेसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्याचबरोबर पाच राज्याच्या निवडणुकीदरम्यान शेवटच्या टप्प्यात कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.

उत्तर कोल्हापूरसाठी शिवसेना आग्रही

महाविकास आघाडीत जरी तीन पक्ष सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सर्वांकडून सुरू आहेत. कोल्हापूरच्या या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ही आग्रही आहे. त्यामुळे चर्तेतून मार्ग निघणार की शिवसेना या जागेचा हट्ट धरून बसणार? हही पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सध्या मात्र या जागेसाठी बंटी पाटलांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज तेव्हा मागे घेतला. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज सुरूवातील भरला होता. मात्र अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि सतेज पाटलांचा मार्ग मोकळा झाला. पक्षादेशामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती यावेळी धनंजय माहडिक यांच्याकडून देण्यात आली होती. राज्यात गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका होऊ शकल्या नव्हता. पुढे जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सलोखा रहावा. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा सुरु होती. भाजपसाठी मुंबईची जागा महत्वाची आहे, ती बिनविरोध झाली आहे. त्या बदल्यात कोल्हापूर करावी अशी वरिष्ठांची मागणी होती. असेही महाडिक सांगताना दिसून आले.

‘नाना पटोले तुमचं बेताल वक्तव्य मागे घ्या’, भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

बाळासाहेब युतीतून बाहेर पडणार होते, राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव होता; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवारांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, मलिक म्हणतात…