शरद पवारांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, मलिक म्हणतात…

शरद पवारांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, मलिक म्हणतात...
शरद पवार

शरद पवारांचा (Sharad Pawar) कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. ते होम क्वारंटाईन आहेत त्यांची प्रकृती बरी आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी माध्यमांना दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 24, 2022 | 6:19 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा (Sharad Pawar) कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. ते होम क्वारंटाईन आहेत त्यांची प्रकृती बरी आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी माध्यमांना दिली. डॉक्टरांच्या सल्ल्याने पवारसाहेब उपचार घेत आहेत. गेल्या 2 – 3 दिवसात पवारसाहेबांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड टेस्ट करावी, असे आवाहन स्वतः पवारसाहेबांनी केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले. पुढील ७ दिवसाचे पवारसाहेबांचे जे कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आले आहेत. पवारसाहेबांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा नियोजित कार्यक्रम होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात नेत्यांनाही कोरोनाचा विळखा वाढला आहे. महाराष्ट्रात तर पन्न्नासहून अधिक नेत्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने पुन्हा काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

पवारांना कोरोना, नातू भावनिक

दरम्यान, पवारांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांचे नातू भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आजोबा… काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलंय. तर आमदार रोहित पवारयांनीही ट्वीट करत पवारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पार्थ पवार यांनी पवारांचे ट्वीट रिट्वीट करत आजोबा… काळजी घ्या. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, असं ट्वीट पार्थ पवार यांनी केलंय. तर ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’ असं भावनिक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींकडून पवारांची विचारपूस

पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

‘आजोबा… काळजी घ्या’, शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातू भावनिक, रोहित आणि पार्थ पवारांचं ट्वीट काय?

चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह! पटोलेंविरोधातील आंदोलनात 2 वेळा सहभागी, पोलिसांनीही घेतलं होतं ताब्यात!

Sharad Pawar Corona Update : पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें