दुसऱ्या टप्प्यात बीड, नांदेड, सोलापूरच्या निकालाची उत्सुकता

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 10 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, बीडच्या खासदार डॉ. प्रितम […]

दुसऱ्या टप्प्यात बीड, नांदेड, सोलापूरच्या निकालाची उत्सुकता
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 10 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी

बुलडाण्यात 63.68 % मतदान झालं, 2014 मध्ये 61.35 % मतदानाची नोंद झाली होती.

अकोल्यात यावेळी 60 % तर 2014 मध्ये 58.51% मतदान झालं होतं.

अमरावतीत 63.86 % मतदान झालंय, 2014 मध्ये 62.29 % मतदानाची नोंद होती.

हिंगोलीत 66.60 % तर 2014 मध्ये हाच आकडा 66.29 % इतका होता.

नांदेडमध्ये यंदा 65.15 % तर 2014 मध्ये हीच आकडेवारी 60.11 % इतकी होती.

परभणीत 63.19 % मतदान झालं, 2014 मध्ये 64.44 % मतदान झालं होतं.

बीडमध्ये 66.08 % मतदान झालंय, 2014 मध्ये 68.75 % मतदान झालं होतं.

उस्मानाबादमध्ये यावेळी 63.42 % मतदान झालं, 2014 मध्ये ही आकडेवारी 63.65 इतकी होती.

लातूरमध्ये 62.20 % मतदान झालं, 2014 मध्ये 62.69 % मतदान झालं होतं.

सोलापुरात 58.54 % मतदान झालं, 2014 मधली आकडेवारी 55.88 % इतकी होती.

कोणत्या जागांसाठी किती सभा?

सध्या 10 जागांवरील खासदारांचा विचार केल्यास भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 4 खासदार आहेत, तर काँग्रेसकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जागा आहेत. दुसऱ्या टप्प्यातही युती आणि आघाडीकडून जोरदार प्रचार झालाय. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातल्या 3 तर उर्वरित जागा मराठवाड्यातील आहेत. पण निकालात कोण बाजी मारणार यावरुन तर्कवितर्क सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेतली, त्यानंतर लातूरमध्येही मोदींसह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची सभा झाली.

दुसऱ्या टप्प्यात 2014 च्या तुलनेत मतांची टक्केवारी कमी आहे. उन्हाचा परिणाम म्हणून मतदान झालं नाही. पण कमी झालेली टक्केवारी कुणासाठी त्रासदायक हे गणित लावणं कठीण असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. 2014 चा विचार केला तर युतीचाच बोलबाला होता. पण यंदा आघाडी सुद्धा ताकदीने मैदानात उतरली. आता मतदारांनी काय ठरवलंय हे जाणून घेण्यासाठी मतमोजणीच्या दिवसाची वाट पाहावी लागेल.

VIDEO : 48 जागांचा लेखाजोखा