Shahajibapu Patil : आम्ही गद्दार नाही खुद्दार, टीका करणाऱ्यांना शाहजीबापू पाटलांच्या स्टाईनं प्रत्युत्तर, संजय राऊतांबाबत म्हणतात…

| Updated on: Jul 29, 2022 | 6:51 PM

राऊत हे तर केवळ आम्हा आमदारांमधून निवडून जाणारे एक खासदार आहेत बाकी कोणी नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा राऊतांना टार्गेट केलंय. तर आम्ही गद्दार नाही खुद्दार आहे, अशीही हाक दिलीय.

Shahajibapu Patil : आम्ही गद्दार नाही खुद्दार, टीका करणाऱ्यांना शाहजीबापू पाटलांच्या स्टाईनं प्रत्युत्तर, संजय राऊतांबाबत म्हणतात...
आम्ही गद्दार नाही खुद्दार, टीका करणाऱ्यांना शाहजीबापू पाटलांच्या स्टाईनं प्रत्युत्तर, संजय राऊतांबाबत म्हणतात...
Image Credit source: social media
Follow us on

सांगोला : आपल्या एका डायलॉगनं (Kay Zadi Kay Dongar Kay Hotel) रेकॉर्डब्रेक फेमस झालेल्या सांगोल्याचे आमदार शाहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांची अजूनही तुफान बॅटिंग सुरूच आहे. बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून टीका करणाऱ्या नेत्यांना त्यांनी आता त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलंय. एकनाथराव शिंदे (Cm Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात सर्वाधिक जळफळाट संजय राऊतांना झाला. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार शिवसेनेने स्थापन केले, यानंतर राऊत स्वतःला महाराष्ट्राचे प्रती चाणक्य समजत होते. पण, राऊत हे तर केवळ आम्हा आमदारांमधून निवडून जाणारे एक खासदार आहेत बाकी कोणी नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा राऊतांना टार्गेट केलंय. तर आम्ही गद्दार नाही खुद्दार आहे, अशीही हाक दिलीय.

आम्ही गद्दार नाही खुद्दार

तर माझ्या गावरान आणि माणदेशी सांगोल्यातील भाषेचा गौरव माझ्या फोन कॉल वरील चार शब्दाने जगाने केला . पण याचा उद्धव साहेबांसारख्या मोठ्या माणसाला जर खुपत असेल तर ते दुर्दैव आहे.  उद्धव साहेब म्हणतात हे महाराष्ट्रात जन्माला तरी का आले? माझी महाराष्ट्राविषयीची निष्ठा तपासायची लायकी या राज्यात कोणाची नाही, माझा स्वाभिमान हीच माझी महाराष्ट्र राज्या प्रती आणि या राष्ट्राप्रतीची निष्ठा आहे, असे म्हणत बापुंनी उद्धव ठाकरेंनाही उत्तर दिलंय. तसेच आम्ही 50 आमदार गद्दार नव्हे तर खुद्दार आहोत, आम्ही गद्दार असलो तर अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी देताना तुमची बुद्धी गहाण पडली होती काय? असा थेट सवाल त्यांनी गद्दार बोलणाऱ्यांना केलाय.

अडीच वर्षा किती भेटला त्याचा विचार करा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी आमदार वाढीसाठी जाहीरपणे वक्तव्य करत असताना आमची मातोश्री मात्र शांतच होती, त्यामुळेच आम्ही शिंदे साहेबांना नेता म्हणून समर्थपणे निवडले आहे. उद्धव साहेबांनी अडीच वर्षांमध्ये आपल्या कुठल्या आमदारांना किती वेळ दिला ,कोणाचे प्रश्न समजून घेतले याचे चिंतन करावे त्यामध्ये आमदारांची चूक असेल तर आम्ही परत जाहीरपणे माफी मागायला जाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतल्यानंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेब बाहेर पडले, मात्र कोरोनापूर्वी चार महिने सरकार स्थापन झाले. त्यावेळी त्यांनी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जरी सभा घेतल्या असत्या तरी शिवसेनेला, पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना ताकद मिळाली असती पण हे घडले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय.

जास्त बोलायला लावू नका

तर आता उद्धव साहेबांचा मणका पाठ बरी झाली…जाऊदे अधिक नको बोलायला… त्याला काय अर्थ नाही, आमदारांच्या पक्षविलीनीकरणाचा विषयच नाहीस घटनात्मक पद्धतीने सर्व आस्थापनांसमोर आम्ही शिवसेनेतच राहणार आणि धनुष्यबाणही आमचाच असेही बापू म्हणाले आहेत. तर येत्या तीन ते चार दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.