लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, शरद पवारांचा गंभीर आरोप

| Updated on: Feb 13, 2021 | 1:30 PM

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. | Sharad pawar big Statement On red Fort Violence

लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, शरद पवारांचा गंभीर आरोप
शरद पवार
Follow us on

सोलापूर :  प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. (Sharad pawar big Statement On red Fort Violence And Allegation On BJP)

शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

केंद्र सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही

पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एवढीच त्यांची मागणी आहे. केंद्र सरकार केवळ आश्वासन देतेय मात्र प्रत्यक्ष काहीच करत नाही, असा आरोप पवार यांनी केला.

शरद पवार काय म्हणाले…?

एके काळी मी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री नव्हतो. मी सोलापुरचा पालकमंत्री होतो. आम्हाला कोण काय म्हणाले तर इथले घोडके सरकार त्या लोकांचे उद्धार करायचे, अशी आठवणही पवार यांनी जागवली.

नानासाहेब काळे यांच्या मुळे नान्नज देशात नावारूपाला आलं. आधी नान्नज मध्ये पानमळे झाले त्यानंतर कांदा उत्पादन जास्त झाले. आता नान्नज द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. मी कृषी मंत्री असताना देशातील डाळिंब संशोधन केंद्र सोलापुर जिल्ह्यात स्थापन केले, असंही पवार यांनी सांगितलं. शेतीच्या क्षेत्रात विज्ञान आणणे आवश्यक असल्याचं मतंही त्यांनी व्यक्त केलं. तसंच शेतीचं चित्र बदलण्यासाठी विज्ञान आणावंच लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

लाल किल्ल्यावर नेमकं काय झालं होतं?

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमधील काही आंदोलक आक्रमक झाल्याचं सगळ्या देशाने पाहिलं. यापैकी काही आंदोलकांनी थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली. या ठिकाणी या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढाई करुन धुडघूस घातला. मात्र पुढच्या काही दिवसांत लाल किल्ल्यावरच्या धुडगूसीपाठीमागे भाजपचा हात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

(Sharad pawar big Statement On red Fort Violence And Allegation On BJP)

हे ही वाचा :

तडफदार भाषणानंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, पी. चिदंबरम, सुप्रिया सुळेही उपस्थित!