Sharad Pawar: मोठी बातमी! निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवार यांचे ॲक्शनमधूनच उत्तर, थेट बारामतीत..

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार थेट अॅक्शन मोडमध्ये दिसले.

Sharad Pawar: मोठी बातमी! निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवार यांचे ॲक्शनमधूनच उत्तर, थेट बारामतीत..
Sharad Pawar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 9:48 AM

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अनेक बड्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आता स्वत: शरद पवार यांनी असे काही केले आहे या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

बारामतीतील त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत शरद पवार यांनी शेतातील उसाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे उपस्थित होते. गोविंद बागेतील या ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Loading...

मागील पंधरा वर्षांपासून या शेतातून प्रति एकर सुमारे ६० टन ऊस उत्पादन येत होते. मात्र AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर हे उत्पादन प्रति एकर १२० टनपर्यंत वाढले आहे. शरद पवार यांनी या आधुनिक शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या प्रयोगाची माहिती घेतली.

राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेतातील या पाहणीतून आपली सक्रियता कायम ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे निवृत्तीच्या अफवांना ब्रेक लागला असून, ते अद्यापही शेती, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहण्याच्या इच्छेचे संकेत देतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली होती. “एक गोष्ट मी सांगतो, शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि पवार साहेब हे आजही सक्रिय आहेत. मी जवळून त्यांना बघितलं आहे. ते सातत्यानं वेगवेगळ्या प्रकल्पात, कामात रूची घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य होणार नाही. आपल्या आयुष्यात ते कधीही थांबणार नाहीत. आपल्या आयुष्यात ते नेहमी काही ना काही सकारात्मक करत राहतील. मला असा वाटतं की या ज्या चर्चा आहेत, त्या करण्याचं काहीएक कारण नाही” असे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us