AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor Eetha : प्रदर्शनापूर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची बाजी, रचला मोठा विक्रम, जाणून व्हाल थक्क

Shraddha Kapoor Eetha : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या 'ईठा' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच सिनेमाने मोठा विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईठा सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Shraddha Kapoor Eetha : प्रदर्शनापूर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची बाजी, रचला मोठा विक्रम, जाणून व्हाल थक्क
Shraddha Kapoor Eetha
| Updated on: Nov 25, 2026 | 9:36 AM
Share

Shraddha Kapoor Eetha : ‘आशिकी 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळळीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री ‘ईठा’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. 4 डिसेंबर रोजी ‘ईठा’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण चकित करणारी गोष्ट म्हणजे, प्रदर्शनापूर्वीच सिनेमाने मोठा विक्रम रचला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सिनेमातील पहिल्या ‘जी जी रे जी’ या गाण्यावर एका मिनिटाच्या दमदार लावणी सादरीकरणाद्वारे ‘ईठा’ने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या दोन्हीमध्ये आपली नोंद केली आहे.

एका मिनिटात सर्वाधिक महिला सहभागींनी एकत्र लावणीचे हुक स्टेप्स केल्याबद्दल हा खास विक्रम करण्यात आला आहे. हा भव्य विक्रम मोडणारा कार्यक्रम पुण्यातील झील युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे पारंपरिक मराठी वेशभूषेत सजलेल्या शेकडो महिला आणि युवतींनी एकत्र ‘जी जी रे जी’च्या तालावर ताल धरत लावणीचे हुक स्टेप्स केले.

या खास प्रसंगी स्वतः श्रद्धा कपूर, सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माती करिश्मा शर्मा यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड बुक्सच्या अधिकाऱ्यांनी मंचावरून अधिकृत घोषणा करत मॅडॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कठपुतली क्रिएशन्स महाराष्ट्र यांना हा सन्मान प्रदान केला.

श्रद्धा कपूर पारंपारिक हिरव्या नऊवारी साडीमध्ये लूक

या सोहळ्यासाठी श्रद्धा कपूर हिने पूर्ण पारंपरिक लूक केलेला. अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. हिरव्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत होतं. साडीवर सोनेरी नक्षीकामासह कॉपर-पीच रंगाचा पदर आणि रुंद काठ होता. लूक पूर्ण करण्यासाठी श्रद्धा हिने पारंपरिक मराठी दागिने सिल्व्हर चोकर, झुमके, मराठी नथ, बांगड्या, कंबरपट्टा, पायात पैंजण आणि कोल्हापुरी चप्पल घातलेल. केसांत लाल फुलांचा गजरा आणि कपाळावर टिकली लावून श्रद्धा हिने सर्वांना घायाळ केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध