‘संजय राऊतांचे खरे गुरु शरद पवारच’, त्या फोटोवरुन भातखळकरांचा टोला, राणे बंधुंचीही टीका; शिवसेनेचं उत्तर काय?

| Updated on: Dec 08, 2021 | 8:45 PM

शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तसंच राणे बंधुंनीही राऊतांचा खोटक टोले लगावले आहेत.

संजय राऊतांचे खरे गुरु शरद पवारच, त्या फोटोवरुन भातखळकरांचा टोला, राणे बंधुंचीही टीका; शिवसेनेचं उत्तर काय?
संजय राऊत, शरद पवार
Follow us on

मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तसंच राणे बंधुंनीही राऊतांचा खोटक टोले लगावले आहेत.

अतुल भातखळकरांचा टोला

‘धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच’, असं ट्विट करत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय.

नितेश राणेंची टीका

तर आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही. कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही. कधी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठई धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा. जेणेकरुन यूपीएमध्ये जाण्याचं कष्टही वाचेल, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय.

निलेश राणेंचं खोचक ट्विट

तर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला लगावला आहे.

उदय सामंतांचं प्रत्युत्तर

दरम्यान, भाजप नेत्यांच्या संजय राऊतांवरील टीकेला शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. संजय राऊतांचा तो फोटो महाराष्ट्रातील राजकीय परंपरेचं प्रदर्शन आहे. एखाद्या देशातील वरिष्ठ नेता जे सर्वांचेच मार्गदर्शक आहेत. ज्यांचा सल्ला, ज्यांचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदीही घेतात, अशा व्यक्ती समोर उभी असताना त्यांना खुर्ची देणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची परंपरा आहे. राऊत साहेबांनी परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे संस्कृती विसरले त्यांनी अशा पद्धतीचे ट्विट करणे योग्य आहे, असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी भातखळकर आणि राणे बंधुंना दिलं.

इतर बातम्या :

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास

‘बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही’, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण, राष्ट्रपती, संरक्षणमंत्र्यांकडूनही आदरांजली