AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास

बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास
सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 6:31 PM
Share

मुंबई : तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात (Helicopter Accident) अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी रावत हे एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते.

शिक्षण आणि सुरुवात

बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला होता.

विविध पदांवर काम

बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं होतं.

पदकं आणि सन्मान

सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होती. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

‘टीमवर्कमुळे यश’

रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली आहेत. आता त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि आता ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक आहेत. बिपिन रावत म्हणतात, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली होती.

इतर बातम्या :

… आणि देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.