नवी दिल्ली: भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून (Army Chopper Crash) बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.