Shivsena : ‘खरी’ शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगाला ठरवू द्या, शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

| Updated on: Aug 01, 2022 | 8:33 AM

Supreme Court : शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात

Shivsena : खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगाला ठरवू द्या, शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षावर नेमका अधिकार कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला. कारण शिंदेगटाने शिवसेना आमचीच आणि धनुष्यबाणही आमचाच असा दावा केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) स्थापन केलेल्या शिवसेनेचं भविष्य काय पक्षावर नेमका कुणाचा अधिकार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. अश्यातच आता शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलाय. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा, असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. तसंच ‘खरी’ शिवसेना कोणत्या गटाची आहे, याचा निर्णय निवडणूक आयोगाला ठरवू द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

शिंदेगटाकडून नवी याचिका

शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेलाय. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा, असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. तसंच ‘खरी’ शिवसेना कोणत्या गटाची आहे, याचा निर्णय निवडणूक आयोगाला ठरवू द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आमचा निर्णय योग्यच- शिंदे

आम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने जनसागर रस्त्या रस्त्यावर चौका-चौका स्वागत करतोय शुभेच्छा, आशीर्वाद देत आहेत. आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर यापैकी कोणीच आले नसते. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. राज्यातील जनतेला तेच हवं होतं. त्यांच्या मनात ते आहे तो विचार आम्ही बोलून दाखवलाय. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री, आमच्या मनातला मुख्यमंत्री असे लोक बोलत आहेत. त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो. हे पाहिल्यानंतर समाधान वाटतं. हे सर्वांच्या नशिबात नसतं. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो राज्याच्या, लोकांच्या हिताचा आहे. म्हणून जी सत्ता मिळाली जी संधी मिळाली आहे त्याचा उपयोग आम्ही राज्याचा विकास करण्यासाठी करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.