महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे? शिंदे गटाची नवी निशाणी व्हायरल करत उपस्थित केला प्रश्न

यातील एक मेसेज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये आमची नविन निशाणी रिक्षा असा फोटो व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे? शिंदे गटाची नवी निशाणी व्हायरल करत उपस्थित केला प्रश्न
| Updated on: Oct 08, 2022 | 11:31 PM

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सोशल मिडियावर याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात मीन्स व्हायरल होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे? असा प्रश्न देखील सोशल मिडियावर उपस्थित केला जात आहे.

यातील एक मेसेज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये आमची नविन निशाणी रिक्षा असा फोटो व्हायरल झाला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्षावाल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रिक्षा हे चिन्ह आणि फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा रंगू लागली आहे. गाजतोय रिक्षावाला हे गाणं आणि रिक्षावाला हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.