दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंपेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे जबरदस्त प्लानिंग; प्रत्येक जिल्ह्यासाठी ठरवलेयं टार्गेट

| Updated on: Sep 24, 2022 | 6:58 PM

दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंपेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे जबरदस्त प्लानिंग सुरु केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी शिंदे गटाने टार्गेटच ठरवले आहे. दसरा मेळावा जोरदार साजरा करण्यासाठी युवकांचं राज्यव्यपी संघटन सुरु आहे.

दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंपेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे जबरदस्त प्लानिंग; प्रत्येक जिल्ह्यासाठी ठरवलेयं टार्गेट
Follow us on

मुंबई : दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसे मैदानावर होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही गटाचे मेळावे होणार असल्याने आता गर्दी जमवण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे.

दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंपेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे जबरदस्त प्लानिंग सुरु केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी शिंदे गटाने टार्गेटच ठरवले आहे. दसरा मेळावा जोरदार साजरा करण्यासाठी युवकांचं राज्यव्यपी संघटन सुरु आहे.

खासदार श्रिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन इथे युवा सेनेच्या बैठकीतही दसरा मेळाव्याचे नियोजन झाले. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून युवा सेनेला चार हजार लोक आणण्याचे टार्गेट खासदरा श्रीकांत शिंदें यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्ते यावेत यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

पूर्व विदर्भातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची नागपूरात बैठक पार पडली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते मुंबईत नेण्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यातून 20 बसेस आणि काही कार्यकर्ते ट्रेन ने मुंबईत येणार आहेत. अशी माहिती शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांनी दिली आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम आर डी ए मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येणार असल्याचा दावा करत यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी दिली.

आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. जर तिथून आम्हाला शिवतीर्थाची परवानगी मिळाली तर या एमएमआरडीए मैदानाचा वाहनतळासाठी वापर केला जाईल असे लांडे म्हणाले.

लाखो शिवसैनिक मुंबई येणार आहेत. यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जोरदार तयारी करत असल्याचे लांडे यांनी सांगीतले.

कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच आक्रमक होते. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता.

शिवसेनेने कोर्टात याचिका दाखल केली होती. या विरोधात आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळत न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.