Tanaji Sawant : शिवसैनिकांचा संताप तानाजी सावंतावरच का? पुण्यातील कार्यालयासमोर निदर्शने

| Updated on: Jun 23, 2022 | 12:28 PM

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून शिवसैनिकांची कशी घूसमट होतेय हे आ. तानाजी सावंत यांनी सोलापूरातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच कामाला विरोध, निधी रोखून धरणे एवढेच नाहीतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून आमदारांची चेष्टा केली जात असते. सर्वात प्रथम सावंत यांनीच पक्षांतर्गत होत असलेली खदखद बोलून दाखवली होती.

Tanaji Sawant : शिवसैनिकांचा संताप तानाजी सावंतावरच का? पुण्यातील कार्यालयासमोर निदर्शने
शिवसेनेचे बंडखोर आ. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयासमोर शिवसैनिकांची निदर्शने
Follow us on

पुणे :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शिवसैनिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. शिवाय कट्टर शिवसैनिक हा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबतच कसा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. असे असले तरी बंडाच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बरोबर अगदी सुरवातीच्या काळापासून (Tanaji Sawant) आ. तानाजी सावंत हे होते असा सूर आहे. शिवाय ते आता प्रकर्षाने जाणवतही आहे. त्यामुळेच शिवसैनिकांकडून (Rebellious) बंडखोर आ. तानाजी सावंत यांना टार्गेट केले जात आहे. शिवाय आपण पक्षाशी आणि पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी किती एकनिष्ठ आहोत याची एक क्लिप सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यांच्या भूम-परंडा-वाशी या मतदार संघात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे असले तरी शिवसैनिकांचा पहिला रोष हा तानाजी सावंत यांच्यावरच असल्याचे पाहवयास मिळत आहे.

दोन महिन्यापूर्वीच पडली होती ठिणगी

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून शिवसैनिकांची कशी घूसमट होतेय हे आ. तानाजी सावंत यांनी सोलापूरातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच कामाला विरोध, निधी रोखून धरणे एवढेच नाहीतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून आमदारांची चेष्टा केली जात असते. सर्वात प्रथम सावंत यांनीच पक्षांतर्गत होत असलेली खदखद बोलून दाखवली होती. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षावर प्रचंड नाराजी असल्याचे त्यांनी भर कार्यक्रमात सांगितले होते. तेव्हापासून सावंत हे अडगळीला पडले होते. पक्षातील अशा वागणूकीमुळेच त्यांनी नाराज आमदार एकवटण्यास एकनाथ शिंदे यांना मदत केल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे.

एकनाथ शिंदे यांना मदत करण्यात सावंत यांचीच मदत

आज जरी शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर आली असली तरी गेल्या अनेक दिवसांपासून नाराजांना जमवण्याचे काम पक्षातील काही आमदार करीत होते. यामध्ये आ. तानाजी सावंत यांची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप त्यांच्याच मतदार संघात बोलून दाखवला जोतोय. शिवाय मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या सावंताच्या पदरी कायम निराशाच पडली असून ते ही एक कारण मानले जात आहे. अशा परस्थितीमध्ये सावंत यांनी शिवसेनेतील नाराज आमदारांचा एक गट तयार केला आणि शिंदे यांना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. म्हणूनच शिवसैनिकांचा रोष सावंत यांच्यावर असल्याचे बंडाळीच्या पहिल्या दिवशी पासून जाणवत आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिकांची कार्यालयासमोर निदर्शने

शिवसेनेसोबत बंडाळी केलेल्या आमदारांबद्दल आता रोष व्यक्त केला जात आहे. केवळ स्वार्थासाठी पक्ष प्रमुखांना अंधारात ठेऊन आमदारांनी असा निर्णय घेतला आहे. मात्र, गद्दारांना माफी नाही अशी भूमिका घेत शिवसैनिकांकडून निदर्शने केली जात आहेत. आ. तानाजी सावंत यांच्या पुण्यात शिक्षण संस्था असून येथील कार्यालयासमोरच आज शिवसैनिकांनी निदर्शने केली. त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोठ्या घोषणाबाजी करुन हेच का हिंदुत्व असा सवालही उपस्थित केला.