महाविकास आघाडीत महा’बिघाडी’! शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र तर काँग्रेस….
शिवसेना आणि राष्ट्रवादी मुंबई महापालिकेची निवडणुक एकत्र लढवणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. मात्र, याबाबत अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत काँग्रेसने अद्यापही कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

मुंबई : महाविकास आघाडीतील(maha vikas aghadi) मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या(Shivsena – NCP) आघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूका लढवण्याची शक्यता आहे. मात्र या आघाडीत काँग्रेस सहभागी होणार की नाही? याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आलेली नागी. काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेनंतर आता शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडीत एकत्र निवडणुक लढवण्याबाबत अद्यापही एकमत झालेले नाही.
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रीत असल्याचे दिसत आहे. सत्तेत असताना निर्णय घेताला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. तर शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांनी देखील राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते.
भाजपने मुंबई महापालिकेसाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे. शिंदे गट आणि भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आलेय. मनसेला सोबत घेण्याच्या हालचालीही शिंदे गट आणि भाजपकडून सुरु आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी मुंबई महापालिकेची निवडणुक एकत्र लढवणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. मात्र, याबाबत अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत काँग्रेसने अद्यापही कोणतीही भूमिका मांडलेली नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जवळीक
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असेलल्य़ा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच जवळीक आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नेहमीच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असतात. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर देखील शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे दाखवून दिले. तर राष्ट्रवादीची साथ सोडणार असे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात.
