Arjun Khotkar | अर्जुन खोतकर शरीराने कुठेही गेले तरी मनाने शिवसेनेतच! ED च्या त्रासाला कंटाळून शिंदे गटात, अंबादास दानवेंची थेट टीका

अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर अंबादास दानवे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

Arjun Khotkar | अर्जुन खोतकर शरीराने कुठेही गेले तरी मनाने शिवसेनेतच! ED च्या त्रासाला कंटाळून शिंदे गटात, अंबादास दानवेंची थेट टीका
अंबादास दानवे, शिवसेना आमदार, औरंगाबाद
Image Credit source: tv9 marathi
दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jul 30, 2022 | 2:35 PM

औरंगाबादः अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) शरीराने कुठेही गेले तरी ते मनाने शिवसेनेतच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना कंटाळून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलाय, असं वक्तव्य शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन देत असल्याचं वक्तव्य जालन्यात केलं. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे दिल्लीत ठाण मांडून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांसोबत त्यांच्या सातत्याने बैठका सुरु होत्या. जालन्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, औरंगाबादचे अब्दुल सत्तार यांनीदेखील या वाटाघाटीत मध्यस्थी केली. त्यानंतर काल खोतकर आणि अब्दुल सत्तार औरंगाबादेत आले. आज जालन्यात अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एकनाथ शिंदे गटाला मी समर्थन देतोय, असं म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते. यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अंबादास दानवे?

अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर अंबादास दानवे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, ‘ अर्जुन खोतकर शरीराने कुठेही गेले तरी ते मनानी शिवसेनेतच आहेत. केंद्रीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून ते शिंदे गटात गेले. भाजप आणि केंद्रीय यंत्रणेनेच त्यांच्यावर दबाव टाकला. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांचं राजकीय वादविवाद सुरू असतात. त्यांच्याच माध्यमातून हे काम झालेलं असावं. भाजपनेच ईडीची कारवाई, अटकेची धमकी देणे आदी मार्गांनी त्यांच्यावर दबाव आणला. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.

खोतकरांचं वक्तव्य काय?

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून आज मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासून मला संधी दिली. 1999 मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हापासून सच्चा शिवसैनिक म्हणून लढलो. जालन्यातील मतदार आणि शिवसेनेतील नेत्यांनी मला आजपर्यंत साथ दिली. मात्र काही अडचणींमुळे, परिवाराला वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मी परवानगी देखील मागितली असून इथून पुढे एकनाथ शिंदे गटाला मी पाठिंबा देत आहे, असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी सिल्लोडमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाची जाहीर घोषणा होण्याची शक्यता आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें