BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणात बॉम्ब, ‘उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला’

सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना गौप्यस्फोटाचा नवा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे आगामी काळात जसजशा निवडणुका पुढे येतील तसतशा या घडामोडी कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणात बॉम्ब, 'उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला'
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:59 PM

नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मालेगावातील सभेत आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली. “तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मालेगावातील सभेत केली. त्यांच्या या टीकेला आता सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना गौप्यस्फोटाचा नवा बॉम्ब टाकला आहे.

“खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या काँट्रॅक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. पाटणकरांची चौकशी करण्याची मागणी करा. किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्ती केली, राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे. या कॉन्ट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा”, असा खळबळजनक दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

“आज सभा बघून उद्धव ठाकरेंची दया आली. तिकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन करायचे इकडे त्यांचा विरोध करायचा. राहुल गांधींबद्दल दुटप्पी भूमिका घेऊ नका. मुंबईत बाजू वेगळी घ्यायची, मालेगावमध्ये वेगळी भूमिका घ्यायची. पण ही फक्त टोमणे सभा झाली. उद्धव साहेब हिंदुत्व विसरून गेले आहेत”, अशी टीका देखील सुहास कांदे यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत भाजपवर सडकून टीका केली. तसेच विरोधी पक्षाचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे तीन मुद्दे :

1) ‘कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर’

“भाजपमध्ये जे चांगले माणसं आहेत त्यांना विचारतो की, तुमच्या आजूबाजूला जे भ्रष्टाचारी बसल्यानंतर त्या भ्रष्टाचारांच्या मेळ्यात तुम्ही सभ्य माणसं कसे जाऊ शकतात. पण दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफान आरोप करतात. चारित्र्य हनन करतात. कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर, पण यांच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर भारताचा अपमान. तुमचा नेता म्हणजे भारत नाही. एवढा शुद्र माझा भारत नाहीय. मोदींवर टीका केल्यानंतर भारताचा अपमान. मोदी म्हणजे भारत मान्य आहे का? यांच्यासाठी आपल्या क्रांतीकारकांनी रक्त सांडलं होतं? माझा देश मोठा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

2) ‘…तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांचे लागेबांधे आम्हाला काढावे लागतील’

“तुमच्या कुटुंबियांवर बोलल्यानंतर ताबडतोबीने पोलीस कारवाई करतात. घराघरात पोलीस घुसतात. माणूस परराज्यात गेला असेल तर तिकडून पकडून आणता. तुमचं कुटुंब जसं तुम्हाला प्यारं आहे तसं प्रत्येकाचं कुटुंब आपापल्याला प्यारं आहे. आमच्या कुटुंबियांचा बदनामीचा प्रकार तुम्ही थांबवला नाही तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांचे लागेबांधे आम्हाला काढावे लागतील”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. “आतासु्द्धा आम्ही काढत नाहीत. कारण आमचं हिंदुत्व. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही तुमच्या घरामध्ये महिला, मुलं असतील. पण कुणी कुटुंब व्यवस्था मानत नसेल तर प्रश्नच संपला”, अशी टीका त्यांनी केली.

“दुसऱ्याच्या कुटुंबावर आरोप करायचे, घरी धाडी टाकायच्या. हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? शिवसेना काँग्रससोबत गेली म्हणून हिंदुत्व सोडलं. वाटतं तुम्हाला? एक तरी अशी घटना दाखवा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्वापासून लांब गेलो. आम्ही हिंदुत्व म्हणजे मर्यादा पाळतोय हे आमचं हिंदुत्व आहे. राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. माझे वडील, आजोबा जे सांगत आहेत तेच मी बोलतोय”, असं ठाकरे म्हणाले.

3)‘लालू प्रसाद यादव यांची सून गरोदर, बेशुद्ध पडेपर्यंत तिची चौकशी’

“तुम्ही कुणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवत आहात. अनिल देशमुख यांना आत टाकलं होतं. अनिल देशमुख यांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. पाच-सहा वर्षाची चिमुकली. तिची चौकशी केली. लालू प्रसाद यादव यांची सून गरोदर आहे. ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केली. एवढं निर्घृण आणि विकृत हिंदुत्व असू शकत नाही. हे आमचं हिंदुत्व नाहीय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की, परस्त्री मातेसमान आहे. पण तुम्ही घरात घुसताय. महिला गर्भवती असली तरी तिला चौकशीसाठी ताटकळत ठेवत आहात. ती बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करत आहात. सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.