जोरदार पावसाला धारदार भाषणाने उत्तर, उभ्या पावसात धैर्यशील मानेंची खणखणीत सभा

| Updated on: Oct 09, 2019 | 12:05 PM

शिवसेनेचे हातकणंगलेचे युवा खासदार धैर्यशील माने (Shiv Sena MP Dhairyasheel Mane) यांनी सांगली-कोल्हापुरातील सभांची सूत्रं हाती घेतल्याचं चित्र आहे.

जोरदार पावसाला धारदार भाषणाने उत्तर, उभ्या पावसात धैर्यशील मानेंची खणखणीत सभा
Follow us on

सांगली : शिवसेनेचे हातकणंगलेचे युवा खासदार धैर्यशील माने (Shiv Sena MP Dhairyasheel Mane) यांनी सांगली-कोल्हापुरातील सभांची सूत्रं हाती घेतल्याचं चित्र आहे. आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने (Shiv Sena MP Dhairyasheel Mane) यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या. मात्र काल दसऱ्याच्या मुहूर्तावर इस्लामपुरातील त्यांचं भाषण विशेष चर्चेत आहे. उभा पावसात धैर्यशील माने यांनी न थांबता भाषण केलं. जोरदार पावसाला जणू धैर्यशील माने धारदार भाषणाने उत्तर देत होते.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचार शुभारंभाचा काल झाला. या सभेवेळी धो धो पाऊस कोसळू लागला. त्यामुळे काहीक्षण उपस्थितांची तारांबळ उडाली. सभेला आलेल्या खासदारांच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र धैर्यशील माने यांनी छत्री मिटवून बाजूला ठेवली आणि उभ्या पावसात, खड्या आवाजात भाषण सुरु केलं. खासदार मानेंचं धैर्य पाहून उपस्थितांची चुळबूळ थांबली आणि सर्वजण जिथल्या तिथे स्थिरावले.

हुतात्मा चौकातून पावसाचं पाणी वाहात होतं, पण त्या पावसाच्या पाण्यातही सर्वजण भाषण संपेपर्यंत थांबून राहिले.

सांगली- कोल्हापूरला महापुराने वेढलं होतं, तेव्हाही धैर्यशील माने यांनी स्वत: पाण्यात उतरुन पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत केली होती. त्यामुळे पाऊस आणि पाण्याचा सामना हा खासदार धैर्यशील मानेंसाठी नवा नसावा.