Shiv Sena : शिवसेनेच्या ‘त्या’ 12 खासदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा, घरांबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शिवसेनेचे खासदार ही बंड करू शकतात आणि आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात, या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त दिला आहे. नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Shiv Sena : शिवसेनेच्या त्या 12 खासदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा, घरांबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2022 | 1:33 PM

मुंबई :  (Shiv Sena) शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आता हे लोण खासदारांपर्यंत जाऊन पोहचले आहे. शिवसेनेतील खासदार हे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज भेट घेऊ शकतात. दिल्लीत होणाऱ्या या घडामोडीचे पडसाद राज्यात उमटू नयेत म्हणून शिवसेना खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा तर देण्यात आली आहे. पण त्यांच्या घराबाहेरही (Police force) पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आमदारांनी बंड केले त्या दरम्यान जी परस्थिती निर्माण झाली होती तीच स्थिती आताही पाहवया मिळत आहे. नागपूर, कोल्हापूर येथील बंडखोर शिवसेना खासदारांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

खासदारांच्या घर अन् कार्यालयासमोर बंदोबस्त

शिवसेनेचे खासदार ही बंड करू शकतात आणि आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात, या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त दिला आहे. नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त लावल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तर कोल्हापुरातील हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर बंदोबस्त आहे.

या खासदारांच्या सुरक्षेत वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील खासदारांची ऑनलाईनद्वारे बैठक झाली होती. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या खासदारांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. शिवाय या 12 खासदारांचा आता शिंदे गटात समावेशही होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. खासदारांच्या बंडामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदारांबरोबर त्यांच्या मतदार संघातील घर आणि कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात अला आहे. त्यामुळे आमदारांनी बंड केले त्यावेळी झालेली स्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. यावेळी आमदारांऐवजी आता खासदार आहेत. एवढाच काय तो फरक.

खासदारांनी धरले संजय राऊतांना जबाबदार

शिवसेनेतील खासदारांनाही आता संजय राऊत यांनाच जबाबदार धरण्यास सुरवात केली आहे. ही भूमिका केवळ संजय राऊत यांच्यामुळेच घ्यावी लागत आहे. गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती व्हावी अशी  मागणी आता लोकसभा अध्यक्षांकडे कऱण्यात आली आहे. तर आता भाजपासोबत युती हेच पक्षाच्या हिताचे राहील असेही सर्व खासदारांनी सांगितले होते. मात्र, याचा विचारही कुठे झाला नाही. त्यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांनाच आमचे समर्थन राहिल असेही हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. हे सर्व संजय राऊत यांच्यामुळेच झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

शिंदे सोबत बैठकीला उपस्थित असलेले ते खासदार

भावना गवळी

राहुल शेवाळे

हेमंत गोडसे

धैर्यशील माने

संजय मंडलिक

राजेंद्र गावित

श्रीरंग बारणे

संजय जाधव

सदाशिव लोखंडे

प्रताप जाधव

कृपाल तुमाणे

हेमंत पाटील

श्रीकांत शिंदे