मुलीच्या छेडछाड प्रकरणात भाजप नेत्याचा नातू, शिवराज मोरे यांच्या ट्वीटने खळबळ, नवनाथ बन यांना खुलं चॅलेंज!
खरंच तुला मुलीची, आई - बहिणीची काळजी असेल तर या प्रकरणात काय कारवाई व्हावी यासाठी पोलीसांना काय मागणी करणार हे सांग, असं खुलं आव्हान शिवराज यांनी बन यांना दिलंय.

Shivraj More Vs Navnath Ban : भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी कमी आणि आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते जास्त आहेत, असा दावा केलाय. सोबतच या धांगड धिंग्याचे पुरावेच माझ्याजवळ आहेत, असंही नवनाथ बन यांनी सांगितलंय. या आंदोलनात नाईट लाईफच्या वेळी पुण्यात धिंगाणा घातला जातोय, असा मोठा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी रात्री मद्यपान करून रस्त्यावर गुंडगिरी केली, असा खळबळजनक आरोप केलाय. आता याच आरोपांवर शिवराज मोरे यांनी खळबळजनक ट्वीट केले आहे. भाजपच्या मोठ्या नेत्याचा एक नातू आहे. तो ड्रग्ज घेऊन नशेत मुलीच्या मागे लागला होता, असा दावा करत नाईट लाईफ काय असते हे आम्ही तुला दाखवू, असा इशारा दिलाय. त्यामुळे आता हा भाजपचा नेता कोण? आहे, असं राजकीय वर्तुळात विचारलं जातंय.
शिवराज मोरे यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय आहे?
शिवराज मोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये आता तरी डोळे उघड, असं म्हणत नवनाथ बन यांच्यावर सडकून टीका केलीय. “आमचा आरोप नाहीय आमच्याकडे पुरावे आहेत. ज्या मुलीला मारहाण केली मारहाण करणारा मुलगा हा परराज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांचा नातू आहे. तो ड्रग्ज घेऊन नशेत मुलीच्या मागे लागला होता. मुलीला त्याने मारहाण केली. संबंधित मुलगी माझ्या मित्रांची बहीण आहे. ती माझीच बहिण समजून मदतीसाठी आदल्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो. जर विश्वास नसेल तर ही तक्रार प्रत बघा, असा सल्लाही शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांना दिला.
नवनाथ बन आता तरी डोळे उघड. आमचा आरोप नाहीय आमच्याकडे पुरावे आहेत. ज्या मुलीला मारहाण केली मारहाण करणारा मुलगा हा परराज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांचा नातू आहे. तो ड्रग्ज घेऊन नशेत मुलीच्या मागे लागला होता. मुलीला त्याने मारहाण केली. संबंधित मुलगी माझ्या मित्रांची बहिण आहे. ती माझीच बहिण समजून मदतीसाठी आदल्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो. जर विश्वास नसेल तर ही तक्रार प्रत बघा. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा नातू आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी माझी बदनामी केली जात आहे. पण नवनाथ बन एक लक्ष्यात ठेव. मी नेत्याला नाही. पिडीत मुलीला मदत करायला गेलो. तुला जर आम्ही गुंड वाटत असू. तर हो आम्ही मुलीचे रक्षक करणारे गुंड झाले तरी हरकत नाहीय. तुला मात्र सुट्टी नाही. नाईट लाईफ काय असतेय आम्ही हे तुला दाखवू. संध्याकाळी हिंमत असेल तर आमच्या प्रश्नांचे उत्तर दे. आणि खरच तुला मुलीची, आई – बहिणीची काळजी असेल तर या प्रकरणात काय कारवाई व्हावी यासाठी पोलीसांना काय मागणी करणार हे सांग.
@ABPNews
@News18_marathi
@bbcnewsmarathi
@saamTVnews— Shivraj More (@imshivrajmore) October 7, 2026
हो आम्ही मुलीचे रक्षण करणारे गुंड
तसेच, भाजपच्या मोठ्या नेत्यांचा नातू आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी माझी बदनामी केली जात आहे. पण नवनाथ बन एक लक्ष्यात ठेव. मी नेत्याला नाही. पिडीत मुलीला मदत करायला गेलो. तुला जर आम्ही गुंड वाटत असू. तर हो आम्ही मुलीचे रक्षण करणारे गुंड झाले तरी हरकत नाहीय. तुला मात्र सुट्टी नाही, असा इशाराच शिवराज मोरे यांनी दिला.
हिंमत असेल तर आमच्या प्रश्नांचे उत्तर दे
सोबतच, नाईट लाईफ काय असतेय आम्ही हे तुला दाखवू. संध्याकाळी हिंमत असेल तर आमच्या प्रश्नांचे उत्तर दे. खरंच तुला मुलीची, आई – बहिणीची काळजी असेल तर या प्रकरणात काय कारवाई व्हावी यासाठी पोलीसांना काय मागणी करणार हे सांग, असं खुलं आव्हान शिवराज यांनी बन यांना दिलंय. त्यामुळे आता या प्रकरणात शिवराज मोरे आणखी कोणता खुलासा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.