शिवसेनेकडून या सात जागांवर वेट अँड वॉच, इच्छुक एबी फॉर्मसाठी ‘मातोश्री’वर

| Updated on: Sep 30, 2019 | 10:05 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्या (मंगळवार) परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल यांनी दिलं. यासोबतच इतर काही जागांवरही (Shivsena Candidates list) शिवसेनेने अजून एबी फॉर्म दिलेले नाहीत.

शिवसेनेकडून या सात जागांवर वेट अँड वॉच, इच्छुक एबी फॉर्मसाठी मातोश्रीवर
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्या संदर्भात शिवसेनेने (Shivsena Candidates list) वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ‘मातोश्री’वर सकाळपासून आलेल्या रश्मी बागल अखेर रात्री रिकाम्या हाताने परतल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्या (मंगळवार) परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल यांनी दिलं. यासोबतच इतर काही जागांवरही (Shivsena Candidates list) शिवसेनेने अजून एबी फॉर्म दिलेले नाहीत.

या जागांवर वेट अँड वॉचची भूमिका

वडाळा : श्रद्धा जाधव (इच्छुक) ही जागा युतीत भाजपकडे गेल्याची चर्चा आहे. विद्यमान कांग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

वांद्रे पूर्व खेरवाडी : तृप्ती सावंत, विद्यमान आमदार. इथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा आहे.

भांडूप पश्चिम : अशोक पाटील, विद्यमान आमदार. इथे शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक रमेश कोरगावकरही इच्छुक आहेत.

बेलापूर :- विजय नाहटा (इच्छुक) आहेत. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. शिवाय इथे मंदा म्हात्रे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत.

हतगाव : नागेश पाटील

सोलापूर मध्य : दिलीप माने (काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश)

करमाळा :- रश्मी बागल (राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश), इथे शिवसेना विद्यमान आमदार नारायण पाटील आहेत.