“नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं”, पेडणेकरांची टीका

"नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं", अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली आहे.

नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं, पेडणेकरांची टीका
| Updated on: Sep 13, 2022 | 1:01 PM

मुंबई : “नुसतं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं”, अश्या कठोर शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका आहे. आगामी निवडणुकीत एकही नेता शिवसेनेत नसेल, सगळे शिंदेगटात येतील, असं बावनकुळे म्हणाले होते. त्याला उत्तर देताना पेडणेकरांनी हे विधान केलंय. शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याचं पेडणेकर म्हणाल्या आहेत.