AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गश्मीर महाजनीचं अंगावर शहारे आणणारं जगदंबेचं गोंधळ; पहा व्हिडीओ

सत्यघटनेमागील सत्य.. या टॅगलाइनसह 'सालबर्डी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनीने जगदंबेचं गोंधळ सादर केलं आहे. गश्मीरला पहिल्यांदाच या अंदाजात पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

गश्मीर महाजनीचं अंगावर शहारे आणणारं जगदंबेचं गोंधळ; पहा व्हिडीओ
Gashmir MahajaniImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 2:26 PM
Share

गावोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणारे गोंधळी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यांची भक्ती, त्याची ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करते. येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे. या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.

‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ । अंधार मातला थोर, असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे ।

असे या गोंधळाचे बोल आहेत. संबळाच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एन्ट्री वेगळीच रंगत वाढविणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.

गावातील गूढ शांततेच्या आड दडलेलं जीवघेणं रहस्य उलगडण्यासाठी हा गोंधळी येतोय का? अशा प्रश्नांची उत्सुकता यामुळे निर्माण झाली आहे. याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणतो, “गोंधळ ही केवळ परंपरा नाही, तर देवीभक्तीची एक ऊर्जादायी अभिव्यक्ती आहे’. ‘सालबर्डी’मधील माझा गोंधळी हा कथानकाला वेगळी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा आहे. गोंधळ गीतामध्ये असलेली ऊर्जा, नाद आणि पारंपरिक वातावरण यामुळे शूटिंग करतानाच अंगावर रोमांच उभे राहत होते. प्रेक्षकांनाही हा अनुभव नक्कीच जाणवेल.”

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल