AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकालाच्या तासभरआधी जायंट किलर ठरलेल्या आमदाराचा खळबळजनक दावा, ‘हे मी जबाबदारीने….’

Shivsena MLA Disqualification Case | निकालाच्या तासभरआधी आमदाराने मोठा दावा केलाय. या आमदाराने गौप्यस्फोट केलाय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हा आमदारा जायंट किलर ठरला होता. महत्त्वाच म्हणजे हे सर्व मी जबाबदारीने बोलतोय असं त्याने सांगितलं.

निकालाच्या तासभरआधी जायंट किलर ठरलेल्या आमदाराचा खळबळजनक दावा, 'हे मी जबाबदारीने....'
uddhav thackeray and eknath shinde
| Updated on: Jan 10, 2024 | 3:20 PM
Share

Shivsena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात काहीवेळात निर्णय लागणार आहे. सगळ्यांच लक्ष या निकालाकडे लागलं आहे. निकालाला काहीवेळा बाकी असताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक दावा केलाय. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच सगळा निकाल ठरलाय असा दावा वैभव नाईक यांनी केलाय. “मी कामानिमित्त मंत्रालयात आलो होतो, मी हे जबाबदारीने बोलतोय. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही अपात्र होणार. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार” असं वैभव नाईक म्हणाले.

“दोन दिवसापूर्वीच निकाल ठरलाय. उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे काही लोकांना आधीपासूनच माहित होतं” असा दावा वैभव नाईक यांनी केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक शिवसेनेचे जायंट किलर ठरले होते. त्यांनी माजी मंत्री आणि कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता.

‘मला नाईलाजाने बोलाव लागतय’

“सुनील प्रभू पक्ष प्रतोद म्हणून वैध ठरले होते. त्यांचा व्हीप पहिल्यादिवसापासून आम्ही मानतोय” असं वैभव नाईक म्हणाले. “हे सर्व वेळकाढूपणाच धोरण होतं. निर्णय त्यांना द्यायचा नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, म्हणून ते निकाल देतायत, आमच्याविरोधात निकाल आहे” असं वैभव नाईक म्हणाले. हे मला नाईलाजाने बोलाव लागतय असं ते म्हणाले.

आजच्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचन करणार आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान