ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत

गुंडांच्या सरदारांना पाचवर्ष नाही २५ वर्ष घरी बसवू, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut on Uddhav thackeray and ravindra waikars wife financial dealing) 

ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत
| Updated on: Nov 13, 2020 | 3:13 PM

मुंबई : “ईडीचे मालक दिल्लीत बसले आहेत, तेच आहेत, तेही व्यापारी आहेत. मात्र या व्यापारांना, त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू,” असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut on Uddhav thackeray and ravindra waikars wife had bought land)

“भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जे जमिनीच्या व्यवहाराचे आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली आहे. त्या ईडीचे मालक दिल्लीत बसलेत. ते व्यापारीच आहेत. मात्र या व्यापारांना त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू,” अशी टीका संजय राऊत यांनी थेट केंद्रावर केली.

“ईडी, सीबीआय, इंटरपोल, सीआय, केजी, युनोकडे जा किंवा इतर कुठेही जा, ते स्वत: भ्रष्टाचारी आहे. त्यांच्या तोंडाला शेणाचा वास येतो आहे, ते दुसऱ्याच्या तोंडाला वास घेत आहेत,” असेही ते म्हणाले.

“या व्यापारांचे जे एजंट आहेत, तेच ईडी वैगरे सांगत आहे. ईडी काय तुमच्या बापाची नोकर आहेत का? तसं असेल तर सांगा. रोज रोज हे काय धंदे सुरु आहेत,” अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.

“आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्याची आहे. ज्यांनी त्यांच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलं, त्यांना शिक्षा देण्याची आहे. मात्र शेठजींच्या पक्षातील काही प्रवक्ते आहेत, त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. म्हणून ते अशाप्रकारची फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

“हा व्यवहार पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून केलेला आहे. जर एखादा व्यवहार केला असेल तर त्यात भ्रष्टाचार, भ्रष्टाचार असे बोंबलत आहेत. ते रोज सकाळी आरशात स्वत:चा चेहरा पाहतात. त्यांना स्वत:कडे पाहून भ्रष्टाचार झाला असं वाटतं,” असेही संजय राऊत म्हणाले.  (Shivsena MP Sanjay Raut on Uddhav thackeray and ravindra waikars wife had bought land)

संबंधित बातम्या :

ठाकरे-वायकरांनी किती जमिनी एकत्रित खरेदी केल्या?; जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का?; सोमय्यांचा सवाल