ठाकरे-वायकरांनी किती जमिनी एकत्रित खरेदी केल्या?; जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का?; सोमय्यांचा सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आणखी आरोप केले आहेत. (Uddhav thackeray and ravindra waikars wife had bought land from Naik, says Kirit Somaiya)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:34 PM, 12 Nov 2020
ठाकरे-वायकरांनी किती जमिनी एकत्रित खरेदी केल्या?; जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का?; सोमय्यांचा सवाल

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आणखी आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करणे हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणूनच हा प्रश्न करत आहे. सामान्य व्यक्ती असता तर विचारलंही नसतं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे. (Uddhav thackeray and ravindra waikars wife had bought land from Naik, says Kirit Somaiya)

किरीट सोमय्या यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे-वायकर परिवाराच्या जमीन खरेदी व्यवहारावर लक्ष वेधतानाच अन्वय नाईक आणि ठाकरे परिवाराचे काय आर्थिक संबंध आहेत? असा सवाल केला. उद्धव ठाकरे यांचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? त्यांचा जमिनीत गुंतवणूक करण्याचा व्यवसाय आहे का? रेवदंड्यातच जमिनी खरेदी करण्याचे कारण काय?, ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचा आर्थिक संबंध काय? या दोन्ही कुटुंबात किती जमिनींचा व्यवहार झाला?, असा प्रश्नांचा भडिमार सोमय्या यांनी केला. (Uddhav thackeray and ravindra waikars wife had bought land from Naik, says Kirit Somaiya)

ठाकरे-वायकर कुटुंबांच्या नावावर 21 जमिनींचे सातबारे उतारे आहेत. दोन्ही कुटुंबांनी 21 जमिनींचे आर्थिक व्यवहार केले असून त्यांनी त्यांच्या पत्नींच्या नावावर हे व्यवहार केले आहेत. वायकर हे शिवसैनिक आहेत. त्यांच्याशी ठाकरे परिवाराचा जमिनी व्यवहारात संबंध कसा आला? हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठाकरे आणि वायकर कुटुंब जमिनींचे व्यवहार का करत आहेत? हा प्रश्न मला पडलेला आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणून एकत्र आला असाल तर तसं जाहीर करावं, असं आवाहनही सोमय्या यांनी केलं.

 

संबंधित बातम्या:

Ravindra Vaikar | किरीट सोमय्यांच्या आरोपांवर रविंद्र वायकरांचा पलटवार

Special Report | ‘रश्मी ठाकरे-नाईक कुटुंबियांमध्ये जमिनीचा व्यवहार’ : किरीट सोमय्या

Kirit Somaiya | रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

(Uddhav thackeray and ravindra waikars wife had bought land from Naik, says Kirit Somaiya)