“भाजपला मास्टरस्ट्रोक आवश्यक, यूपी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र फोडणे गरजेचा”

| Updated on: Jul 01, 2021 | 8:29 PM

बैठकीला संजय राऊत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या गुप्त बैठकांच्या सत्रावरुन राजकीय विश्लेषक संजय आवटे महत्वाचा अंदाज व्यक्त केलाय.

भाजपला मास्टरस्ट्रोक आवश्यक, यूपी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र फोडणे गरजेचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांची बैठक
Follow us on

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचं सत्ताधारी पक्षातील सर्वच नेते, मंत्री आवर्जुन सांगत आहेत. मात्र, राज्यात सुरु असलेल्या घडामोडीमुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्याने दिसून येत आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. या बैठकीला संजय राऊत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या गुप्त बैठकांच्या सत्रावरुन राजकीय विश्लेषक संजय आवटे महत्वाचा अंदाज व्यक्त केलाय. (BJP’s attempt to change power in Maharashtra before Uttar Pradesh Assembly elections)

संजय आवटे यांचा नेमका अंदाज काय?

‘एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना आणि राष्ट्रवादीत काही वितुष्ठ आहे हा भ्रम चुकीचा आहे. मात्र, महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न भाजप पहिल्यापासूनच करत आहे. आता असं दिसत आहे की, त्या सगळ्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. आता भाजप एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. अशावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेना किंवा राष्ट्रवादीपैकी एका पक्षाला सोबत घेतल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. भाजपला आमदार फोडून सरकार स्थापन करणे शक्य नाही. मात्र, शिवसेना किंवा राष्ट्रवादीही सहजासहजी भाजपसोबत येईल असं वाटत नाही. मग अशावेळी भाजप केंद्रातील सत्तेचा वापर कशाप्रकारे करत आहे हे आपल्याला माहिती आहे’.

‘अशावेळी हे दोन्ही पक्ष भाजपसोबत जायचं की एकसोबत येत भाजपचा डाव उलथून लावायचा हे दोन्ही पक्ष पाहत आहेत. त्याची पडताळणी हे दोन्ही पक्ष करत आहेत. साधारणपणे आता असं दिसत आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादीत असलेल्या वितुष्ठाचं पर्यावसान पुढे चालून कुणीतरी भाजपसोबत जाण इथपर्यंत होऊ शकतं हे नाकारता येत नाही. अशावेळी हे सरकार टिकवण आणि भाजपचा डाव असेलच तर तो उधळून लावणं हे सर्वात मोठं आव्हान या दोन्ही पक्षांपुढे आहे’.

‘काँग्रेस पहिल्यापासूनच पॅसिव्ह भूमिकेत’

दरम्यान, संजय राऊत यांची इच्छा काय आहे यापेक्षा या दोन्ही पक्षांनी मिळून चर्चा करुन यावर मार्ग काढणं आवश्यक आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका ही पहिल्यापासून पॅसिव्ह आहे. मात्र, उद्या सरकार पडलं तर आपली भूमिका ठोस होती हे दाखवण्यासाठी काँग्रेस स्वबळाचा नारा अलीकडे देत आहे. खरं पाहायला गेलं तर दोन्ही पक्ष सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दोन्ही पक्षांचं भाजपसोबत काय सुरु आहे हे एकमेकांना माहिती नाही, अशा विचित्र घडामोडी महाराष्ट्रात सध्या सुरु आहेत.

‘उत्तर प्रदेशपूर्वी भाजपला मास्टर स्ट्रोक गरजेचा’

शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटले ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण या दोन्ही पक्षांचं भाजपसोबत काय सुरु आहे हे एकमेकांना माहिती नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बंगाल निवडणुकीत भाजप बॅकफूटवर गेलाय. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मास्टर स्ट्रोक हवा आहे आणि तो महाराष्ट्राच्या रुपाने मिळू शकतो असं भाजपला वाटतं. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील सरकार गेल्यानंतरच देशपातळीवर भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे, असं मत संजय आवटे यांनी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

सरकार वाचवण्यासाठी हालचाली, संजय राऊत यांची गुप्त बैठक, कोण कोण उपस्थित?

शिवसेनेकडील खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP’s attempt to change power in Maharashtra before Uttar Pradesh Assembly elections