मोठी बातमी | शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी सुनावणी, वाचा Update!

| Updated on: Nov 29, 2022 | 1:33 PM

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं.

मोठी बातमी | शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर या दिवशी सुनावणी, वाचा Update!
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः शिवसेना (Shivsena) कुणाची? एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची? या संबंधी महत्त्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर (Election Commission) येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावं देण्यात आली होती. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही पक्षांना नावं आणि चिन्ह देण्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.

या दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छानणी आता केली जाईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी केली जाईल. या सुनावणीवेळीही अंतिम निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, काही महापालिका निवडणुकांपूर्वीही शिवसेना पक्षचिन्हाचा वाद सुटला नाही तर दोन्ही गटातील नेत्यांना ढाल तलवार आणि मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी शक्यता आहे.