भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार, सूत्रांची माहिती

| Updated on: Oct 27, 2019 | 9:41 AM

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Shivsena Will Get Deputy Chief Minister) आहे.

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार, सूत्रांची माहिती
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेमध्ये यंदा 50 टक्के वाटा देण्यात यावा, यासाठी शिवसेनेनं भाजपवर दबावतंत्र टाकण्यास सुरुवात केली (Shivsena Will Get Deputy Chief Minister) आहे. राज्यात अडीच-अडीच मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना ठाम आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Shivsena Will Get Deputy Chief Minister) आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सत्ता स्थापनेनंतर सुरुवातीची अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. तर भाजप मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देणार असल्याचे सांगितलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी (26 ऑक्टोबर) मातोश्रीवर बैठक पार पडली. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thcakeray ) यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. राज्यात युतीचेच सरकार पुन्हा स्थापन करायचे असेल, तर भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय पर्याय नाही.

मात्र यंदा ‘बार्गेनींग पॉवर’ वाढल्याने शिवसेनेनंही भाजपवर दबावतंत्र वाढवलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांपुढे भाषणात मांडलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर आले होते. त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरला होता. म्हणजे 144-144 हे जागा वाटपाचे सूत्र ठरले होते. पण, जागा वाटपावेळी भाजपची अडचण मी समजून घेतली. पण आता आम्हाला सत्तेत 50 टक्के वाटा हवा आहे. भाजप नेत्यांनी ते आम्हाला लेखी मान्य करावं, म्हणजे भविष्यात कुठली अडचण किंवा वाद होणार नाहीत, असं उद्धव ठाकरे (Shivsena Will Get Deputy Chief Minister) म्हणाले.

हिंदुत्वाच्या आधारावर ही युती आहे. त्यामुळे युतीचे सरकार स्थापन व्हावे, अन्य उपलब्ध पर्यायांचा विचार करायला लागू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.