मुलाचा फोटो शेअर करत का म्हणाले श्रीकांत शिंदे, “हे पाप कुठेही फेडता येणार नाही”

एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो... टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही.

मुलाचा फोटो शेअर करत का म्हणाले श्रीकांत शिंदे, हे पाप कुठेही फेडता येणार नाही
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 5:44 PM

मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे( uddhav thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाप काढला. बाप चोरणारी औलाद असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्ही तर बापच विकण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला. यानंतर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी मुलाचा फोटो शेअर करत भाविक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. काय दिवटं कारटं माझ्या पोटी जन्माला आलं. माझ्या ऐवजी दुसऱ्यांच्या वडिलांचं नाव लावतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेचा बाप काढला होता.

तर, बाप चोरणारे म्हणता. तुम्ही तर बापाचे विचारच विकले. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. माझा नातू बच्चू दीड वर्षाचा आहे रुद्रांश. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर.काय बोलायचं किती बोलायचं किती लेव्हलवर जायचं अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली.

एकनाथ शिंदे यांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे यांनी देखील एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो… टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका. कृपा करा असे श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.