Sushma Andhare | तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, भोंदूबाबा प्रकरणी सुषमा अंधारे कडाडल्या
ज्योतिष सांगणाऱ्या भोंदूबाबाचे पाय आणखीनच खोलात गेले आहेत. असंख्य महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच त्याच्याकडे सापडलेल्या पेन ड्राइव्हमध्ये शेकड्याने अश्लील व्हिडिओ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी रान माजवलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून कथित बाबा अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ज्योतिष सांगणाऱ्या भोंदूबाबाचे पाय आणखीनच खोलात गेले आहेत. असंख्य महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच त्याच्याकडे सापडलेल्या पेन ड्राइव्हमध्ये शेकड्याने अश्लील व्हिडिओ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी रान माजवलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून कथित बाबा अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी केली आहेच, शिवाय या बाबाशी जवळचे संबंध असणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. हा भोंदूबाबा नाही तर विकृतबाबा आहे. त्याच्याशी रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे, जयंत पाटील, निलेश लंके यांचे संबंध होते, असा खळबळजनक दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे याबाबाकडे नेहमी जात होते. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासबोतही कॅप्टन खरातचा फोटो आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं सांगतनाच जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर या भोंदूबाबाकडे गेले असतील तर त्यांचीही चौकशी करा. माझ्या पक्षााचा कोणी यात अडकला असेल तर त्याचीसुद्धा गय केली जाऊ नये, हा प्रश्न लेकीबाळींच्या इभ्रतीचा आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 20, 2026 02:15 PM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट

