AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMC Election 2022 : सोलापूर वॉर्ड 01 : 2017 साली चारही वॉर्ड भाजपने जिंकले! 2022 मध्ये 3 वॉर्ड, पुन्हा कमळ फुलेल?

Solapur municipal corporation election 2022 : एकूण वॉर्डची संख्या 113 असून त्यापैकी 57 वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेत.

SMC Election 2022 : सोलापूर वॉर्ड 01 : 2017 साली चारही वॉर्ड भाजपने जिंकले! 2022 मध्ये 3 वॉर्ड, पुन्हा कमळ फुलेल?
सोलापूर वॉर्ड क्रमांक 01Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 26, 2022 | 6:00 AM
Share

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिकांपैकी सोलापूर (Solapur Municipality Corporation 2022) ही एक महत्त्वाची महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेत 2022 साली कुणाचा विजयी झेंडा फडकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, 2017 च्या तुलनेत 2022 च्या सोलापूर पालिका निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड आहे? 2017 साली कुणी विजय मिळवला होता? एकूण नेमकी सोलापूर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकचा (SMC 2022 Election ward no 1) इतिहास काय सांगतो, तसंच नेमके वॉर्ड किती? आधी किती वॉर्ड होते? कोणत्या वॉर्डमधून कोण विजयी झालं होतं? नव्या रचनेप्रमाणे आता नेमके किती वॉर्ड आहेत, तसंच आरक्षणामुळे राजकीय (Solapur Politics) गणितं नेमकी कशी बदलणार आहेत, यावरुनही अनेक गोष्टी ठरतील. त्यामुळे सोलापूर महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये नेमकं काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी वॉर्ड क्रमांक एकमध्ये 2017 साली काय घडलं होतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सोलापूर महानगर पालिकेचा वॉर्ड क्रमांक एक मध्ये 2017 साली एकूण चार वॉर्ड होते. मात्र 2022मध्ये नव्या रचनेनुसार आता प्रभाग क्रमांक एक हा तीन वॉर्डमघ्ये विभागण्यात आला आहे. त्यामुळे एक वॉर्ड कमी झाला आहे. 2017 साली भाजपने सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील चारही वॉर्डात विजय मिळवला होता. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक हा भाजपच्या वाट्याला गेला होता. आता 2022 मध्ये पुन्हा हीच किमया भाजपला साधता येऊ शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

जातीचं गणित

2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये एकूण लोकसंख्या किती होती, तसंच एकूण लोकसंख्येपैकी जाती वर्गीकरणं खालीलप्रमाणे होते.

  • एकूण लोकसंख्या 24617
  • अनुसूचित जाती 9010
  • अनुसूचित जमाती 398

नव्या रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक एकमध्ये कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित झाला आहे, त्यावर एक नजर टाकुयात..

सोलापूर नगपालिका निवडणूक 2022 : आरक्षण

  • 1 अ अनुसूचित जाती
  • 1 ब सर्वासाधारण महिला
  • 1 क सर्वसाधारण

सोलापूर महानगरपालिकेमध्ये 2017 साली एकूण 26 प्रभाग होते. तर आता प्रभागांची संख्या वाढून 37 इतकी झाली आहे. प्रत्येक प्रभागात 2017 साली जवळपास चार वॉर्ड होते. तर 2022साली आता प्रत्येक प्रभागात एकूण तीन वॉर्ड आहेत. मात्र याता प्रभाग क्रमांक 38 हा अपवाद आहे.

नव्या रचनेनुसार एकूण वॉर्डची संख्या 113 असून त्यापैकी 57 वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेत. तर अनुसूचित जातींसाठी 16 वॉर्ड आरक्षित झाले असून त्यातील अर्धे वॉर्ड म्हणजेच 8 वॉर्ड हे अनुसूजित जातींच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर अनुसूचित जमातींसाठी दोन वॉर्ड आरक्षित करण्यात आले. त्यातील एक वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव करण्यात आलाय.

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 01 : 1 अ

 उमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 01 : 1 ब

 उमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 01 : 1 क 

 उमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

2017 साली कोण विजयी

  • 1 अ रविंद्र गायकवाड भाजप
  • 1 ब राजश्री कनके भाजप
  • 1 क निर्मला तांबे भाजप
  • 1 ड अविनाश पाटील भाजप

प्रभाग क्रमांक 1 चा भूगोल

सोलापूर नगरपालिकेच्या प्रभाक क्रमांक एकमध्ये जवळकर वस्ती, रमाबाई आंबेडकर नगर, हनुमान नगर, विद्या नगर, शेळगी गावठाण, वर्धमान नगर, रुपाभवानी मंदिर, इ. महत्त्वाचा भाग मोडतो. या भागातील जनता 2022 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच्या बाजूने मतदान करते, की निकाल काही वेगळा लागतो, ये काळात स्पष्ट होईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.