SMC Election 2022 : सोलापूर वॉर्ड 02 : सोलापूर प्रभाग क्रमांक 02 मध्ये कोण मारणार बाजी?

Solapur municipal corporation election 2022 : 2017 सालच्या पालिका निवडणुकीत भाजपचा दबदबा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाहायला मिळाला होता.

SMC Election 2022 : सोलापूर वॉर्ड 02 : सोलापूर प्रभाग क्रमांक 02 मध्ये कोण मारणार बाजी?
सोलापूर प्रभाग क्रमांक 02
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 26, 2022 | 6:05 AM

सोलापूर : 2017 साली सोलापूर महानगरपालिकेचा (Solapur Municipality Corporation 2022) गड भाजपने जिंकला होता. इतकंच काय तर प्रभाग क्रमांक एक प्रमाणेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले. चार पैकी चारही वॉर्डमध्ये आपला उमेदवार निवडणूक आणण्याची किमया भाजपने प्रभाग क्रमांक दोनमध्ये करुन दाखवली होती. दरम्यान, 2022 निवडणूक ही वेगवेगळ्या राजकीय घडमोडींमुळे (SMC 2022 Election ward no 2) महत्त्वाची असणार आहे. त्यातही आरक्षण, प्रभाग फेररचना या सगळ्यामुळे पालिका निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झालंच आहे. अशातच 2017 साली सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय झालं होतं? नेमकी तेव्हा लोकसंख्या किती होती? 2022 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनचा एक वॉर्ड कमी झालेला आहे. रचनेत फेरबदल झाला आहे. अशावेळी कोणकोणता भाग प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोडतो, तसंच आरक्षण नेमकं कोणत्या वॉर्डात कुणाला आहे, याचा आढावा घेणंही महत्त्वाचं आहे.

2017 साली सोलापूर पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये नेमकी एकूण लोकसंख्या किती होती, आणि जातीनिहाय वर्गवारी काय आहे, ते जाणून घेऊयात..

लोकसंख्येचं गणित

  • एकूण लोकसंख्या 26618
  • अनुसूचित जाती 2706
  • अनुसूचित जमाती 539

नव्या आरक्षण सोडतीनुसार सोलापूर प्रभाग क्रमांक दोन मधील दोन वॉर्ड हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर एक वॉर्ड ओपन आहे.

कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित?

  • 2अ सर्वसाधारण महिला
  • 2 ब सर्वसाधारण महिला
  • 2त सर्वसाधारण

2017 सालच्या पालिका निवडणुकीत भाजपचा दबदबा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाहायला मिळाला होता. भाजपचे चारही उमेदवार या निवडणुकीत जिंकले. हीच किमया भाजपला आता पुन्हा करता येईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं पुन्हा एकदा लक्ष लागलंय.

2017 साली कोणत्या वॉर्डमधून कुणाचा विजय?

  • 2 अ किरण देशमुख
  • 2 ब नारायण बनसोडे
  • 2 क कल्पना कारभारी
  • 2 ड शालन शिंदे

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 02 : 2 अ

 उमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 02 : 2 ब

 उमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 02 : 2 क

 उमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर

सोलापूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 2 : भूगोल

सोलापूर पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील तीन वॉर्डमध्य मिळून दहिटणे गावठाण, ऋषिकेश नगर, मित्र नगर, कामाक्षी नगर, महालक्ष्मी नगर, मेहताब नगर आणि परिसर मोडतो. या वॉर्डमधील जनता पुन्हा भाजपच्या बाजूने कौल देते की वेगळा विचार करते, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र त्याआधी वॉर्डातील राजकीय घडामोडींना वेग आला, तर आश्चर्य वाटायला नको.

सोलापूर महानगर पालिकेची नवी रचना

  • एकूण प्रभाग : आधी 26, आता 37
  • प्रभाग क्रमांक 38 सोडल्यास सर्व प्रभागात एकूण तीन वॉर्ड
  • एकूण वॉर्ड – 113