AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या, हल्ल्यात तिघे जखमी

मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. एका इमारतीमध्ये शिरलेल्या बिबट्याने तिघांना जखमी केले आहे, ज्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या, हल्ल्यात तिघे जखमी
मीरा-भाईंदरमध्ये इमारतीत बिबट्याचा वावर
| Updated on: Dec 19, 2025 | 9:57 AM
Share

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबच्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.

इमारतीत बिबट्याचा वावर, तिघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मीरा-भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील पारिजात नावाच्या बिल्डींगमध्ये हा बिबट्या शिरला. त्या इमारतीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आलं.

मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलावरोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या पारिजात इमारतीत आज सकाळी 8 च्या सुमारास हा बिबट्या दिसला. तेथील एका घरात हा बिबट्या थेट घुसला, तेव्हा घरात 4 माणसं होती. तिथे घरात 25 वर्षांची एक तरूणी आणि काही पुरूष होते.  त्या घरात शिरलेल्या बिबट्याने सर्वांवर हल्ला चढवला. त्यांचे आवाज, आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजली.

त्यांनी तातडीने पोलिसांना व अग्निशमन दलाला फोन करून बिबट्या शिरल्याची, त्याच्या हल्ल्याची माहिती दिली.  त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तातडीने पारिजात इमारतीजवळ दाखल झाले. या हल्ल्यात तिघे जखमी झाले होते, त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात 25 वर्षांची तरूणी जबर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर साईबाब हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रूममध्ये बंद केला बिबट्या

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येण्यास निघाले आहेत. मात्र घटनास्थली नागरिकांची, बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस घटनास्थळी असून  त्या बिबट्याला एका रूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.