AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6: राकेश बापटची पहिली बायको पुन्हा अडकणार विवाहबंधनात! तिचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन

Bigg Boss Marathi 6: सौंदर्याची खाण आहे राकेश बापटची पहिली बायको... अभिनेत्याला घटस्फोट दिल्यानंतर पुन्हा अडकणार विवाहबंधनत! तिचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन... कोण आहे ती?

Bigg Boss Marathi 6: राकेश बापटची पहिली बायको पुन्हा अडकणार विवाहबंधनात! तिचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन
Raqesh Bapat
| Updated on: Feb 03, 2026 | 1:05 PM
Share

Bigg Boss Marathi 6: अभिनेता राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 मध्ये दमदार खेळी करताना दिसत आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या राकेश याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. याआधी देखील राकेश हिंदी बिग बॉसमध्ये दिसला आहे. लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राकेश याची पहिली पत्नी आणि घटस्फोटाबद्दल देखील अनेकांना माहिती आहे. पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्याची पूर्व पत्नी पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

राकेश बापट याच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री रिद्धी डोगरा हिच्यासोबत अभिनेत्याने लग्न केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या जवळपास 6 वर्षांनंतर रिद्धी आणि राकेश यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर रिद्धी हिने दुसऱ्या लग्नावर देखील मोठं वक्तव्य केलं होतं, ‘मी प्रेमासाठी कायम तयार आहे… मी प्रचंड रोमँटिक आहे… प्रेमात पडायला मला फार वेळ लागत नाही.’ पण रिद्धी असं देखील म्हणाली होती की, ‘प्रेमात असताना समोरच्या व्यक्तीकडून माझा अपमान देखील झाला आहे. प्रेमात पडणं चुकीचं नाही, पण आत्मसन्मान देखील फार गरजेचं आहे…’ असं देखील रिद्धी म्हणाली होती.

रिद्धीचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन

रिद्धी हिने स्वतः या कनेक्शनबद्दल मोठा खुलासा केला होता. देशाचे दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली अभिनेत्रीचे काका होती. रिद्धी म्हणालेली, ‘अरुण जेटली माझे काका आहेत. पण मला राजकारणात बिलकूल रस नाही…’, अरुन जेटली यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 24 ऑगस्ट 2019 रोजी अखेरचा श्वास घेतला.

राकेश बापट – रिद्धी डोगरा

राकेश बापट – रिद्धी डोगरा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी देखील घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती. घटस्फोटावर राकेश म्हणालेला, ‘7 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आपल्याला कळतं की, कोण तुमच्यासाठी बनलेलं आहे. आमच्याकडे ठोस असं कोणतंच कारण नाही. म्हणून घटस्फोटासाठी कोणाला जबाबदार ठरवणं चुकीचं आहे… पण परस्पर सहमतीने आम्ही विभक्त झालो.’ असं देखील राकेश बापट म्हणालेला.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.