मै रोशनी देती हूँ, लेकीन दुसरो को जला सकती हूँ : प्रणिती शिंदे

| Updated on: Jan 05, 2020 | 8:43 PM

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी शायरीचा दाखला देत नाराज कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या (Praniti Shinde on Thackeray Government Portfolio distribution)   आहेत.

मै रोशनी देती हूँ, लेकीन दुसरो को जला सकती हूँ : प्रणिती शिंदे
Follow us on

सोलापूर : ठाकरे सरकारचे बहुप्रतिक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं (Praniti Shinde on Thackeray Government Portfolio distribution)  आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक मंत्री नाराज असल्याचे सांगण्यात येत होतं. सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेही नाराज असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांकडे दाखवण्यात आल्या. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी शायरीचा दाखला देत नाराज कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या (Praniti Shinde on Thackeray Government Portfolio distribution)   आहेत.

“मै वो शमा हूँ, जो रोशनी मे खेलती हूँ, अपनो के लिये रोशनी देती हूँ, लेकीन दुसरो को जला भी सकती हूँ,” या शायरीचा प्रणिती शिंदे आधार घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमदार प्रणिती शिंदे यांनी आज काँग्रेस भवन मध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. “पंधरा दिवस आपण जे सहकार्य केलं आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार. या ठिकाणी आल्यानंतर मला धीर आला. काँग्रेस के घर मे देर है, अंधेर नही, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. लोकांच प्रेम हे मंत्रीपदापेक्षा मोठ असल्याचंही त्या यावेळी (Praniti Shinde on Thackeray Government Portfolio distribution)  म्हणाल्या.”

मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान केलं होतं.

मी तुमच्या भावना समजू शकते, मात्र ज्या ज्या वेळी अन्याय झाला आहे असं वाटतं. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी न्याय दिला आहे. असे मत प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधताना म्हटलं (Praniti Shinde on Thackeray Government Portfolio distribution)  आहे.