राज ठाकरेंएवढं मोदींचं कौतुक कोणी केलं नाही : सुधीर मुनगंटीवार

| Updated on: Jan 11, 2020 | 3:23 PM

राज ठाकरेंच्या विचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास करेल असे सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar on bjp-mns alliance)   म्हणाले.

राज ठाकरेंएवढं मोदींचं कौतुक कोणी केलं नाही : सुधीर मुनगंटीवार
Follow us on

मुंबई : राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जर राज ठाकरेंचे विचार भाजपशी साम्य असेल तर त्यात अडचण काय आहे. उद्या राज ठाकरेंच्या विचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास करेल असे सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar on bjp-mns alliance)   म्हणाले.

गुजरातमध्ये मोदींचे जे विचार होते. त्या विचारचे कौतुक राज ठाकरेंनी केले, तेवढं अजून कोणीही केलेलं नाही. मनसे आणि भाजप भविष्यात सोबत येण्यास अडचणी नसतील. असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

हिंदुत्वाचा अजेंडा असणे याचा अर्थ कोणाला त्रास देणे असा नाही. इतर समाजाला न्याय देत असताना बहुसंख्य समाजाला न्याय न देणे असे होऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया मुनंगटीवार यांनी दिली.

राज्यात मराठी सक्तीबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, मराठीच्या मुद्द्यावर सर्वच पक्ष सोबत आहेत. या विषयावर सर्वच पक्ष सोबत आहे. मराठीच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कृती करावी. तसेच निर्णय घ्यावा. मराठी भाषेला चांगले दिवस यावे ही आमची भूमिका आहे. येत्या 27 फेब्रुवारीला एक दिवस अधिवेशनात चर्चा करून निर्णय केले गेले पाहिजे असेही मुनंगटीवार (sudhir mungantiwar on bjp-mns alliance)  म्हणाले.

राज्यांना CAA हा कायदा लागू करावाच लागेल. काँग्रेस माहिती अभावी हा कायदा लागू करु नये असे म्हणतं आहे असेही मुनंगटीवार म्हणाले.

बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी मोर्चे निघत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे CAA विरोधात मोर्चा काढणार आहे. त्यांचे मोर्चे हे बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी निघत नाही. आता यांना फक्त CAA दिसत आहे. हे मताचं राजकारण आहे. त्यामुळ हे समाजामध्ये विष पसरवलं जात आहे. राज्यसभेत न बोलणं आणि रस्त्यावर उतरणं हे आश्चर्यजनक आहे अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकार तयार होईल. हा घोटाळा पृथ्वीराज चव्हाण असताना काढला गेला होता. पृथ्वीराज चव्हाणांकडून या संदर्भात अजून थोडी माहिती समोर आली तर चांगलं होईल असेही मुनगंटीवार म्हणाले.

तानाजी सिनेमाला जी.एस.टी सूट द्या

तानाजी या सिनेमालाही करातून सूट मिळणं गरजेचे आहे. छपाकला काँग्रेसच्या राज्यात जी.एस.टी मध्ये सूट देण्यात आली आहे. या सिनेमाला महाराष्ट्रातही सूट देण्यात यावी अशीही मागणीही यावेळी मुनगंटीवार यांनी (sudhir mungantiwar on bjp-mns alliance)  केली.