VIDEO : हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने… लेकीच्या लग्नात बापाची हौस, सुधीरभाऊ शो स्टॉपर

सुधीर मुनगंटीवार यांच्या लेकीचं (Sudhir Mungantiwar daughter wedding) लग्न झालं. या लग्नात मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar dance) लेकीची हौस-मौज पूर्ण केली.

VIDEO : हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने... लेकीच्या लग्नात बापाची हौस, सुधीरभाऊ शो स्टॉपर
सुधीर मुनगंटीवार यांची कन्या शलाका मुनगंटीवार विवाहबंधनात अडकली. या लग्नात जे जे वधूपित्याने करायला हवं, ते संपूर्ण कर्तव्य मुनगंटीवारांनी पार पाडलंच, पण मुनगंटीवारांनी स्वत:ही डान्स करुन, लग्नसोहळ्याला चार चांद लावले.
| Updated on: Dec 04, 2019 | 11:12 AM

चंद्रपूर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेची धावपळ चालू असताना, तिकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar dance) यांच्या घरी वेगळीच रेलचेल होती. मुंबईत सत्तेचा शुभारंभ होत असताना, मुनगंटीवारांच्या घरी सनई चौघडे वाजत होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या लेकीचं (Sudhir Mungantiwar daughter wedding) लग्न झालं. या लग्नात मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar dance) लेकीची हौस-मौज पूर्ण केली. जे जे वधूपित्याने करायला हवं, ते संपूर्ण कर्तव्य मुनगंटीवारांनी पार पाडलंच, पण मुनगंटीवारांनी स्वत:ही डान्स करुन, लग्नसोहळ्याला चार चांद लावले. (Sudhir Mungantiwar daughter wedding)

सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीचं म्हणजे शलाका मुनगंटीवार यांचा विवाह सोहळा नुकताच नागपूर येथे पार पडला. नागपूरच्या एम्प्रेस पॅलेस या ठिकाणी झालेल्या या लग्न सोहळयात संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुधीर मुनगंटीवार म्हणजेच सगळ्यांचे लाडके सुधीर भाऊ यांनी आपल्या पत्नी समवेत काही गाण्यांवर डान्स केला. या कार्यक्रमाला आलेल्या अनेकांनी हा डान्स आपल्या मोबाईल कॅमेरात चित्रित केला.

छोड़ दो आँचल ज़माना क्या कहेगा? या गाण्यापासून ते हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने या गाण्यांपर्यंत, हम साथ साथ है पासून ते रब ने बना दी जोडी या गाण्यांपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांनी कुटुंबासह ठेका धरला. सर्व कुटुंबासाठी ही गाणी कोरिओग्राफ करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब स्टेजवर असताना, सुधीरभाऊ शो स्टॉपर ठरले.

एकीकडे सत्तास्थापनेची धावपळ तर दुसरीकडे लेकीचं लग्न, अशी दुहेरी धावपळीत अडकलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी दोन्ही भूमिका चोख बजावल्या. भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते असलेले मुनगंटीवार निर्णय प्रक्रियेत होते. सत्तास्थापनेच्या घडामोडीबाबत भाजपची भूमिका मीडियाला अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तर दुसरीकडे लेकीचं लग्न त्यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने पै पाहुण्यांचं जबाबदारीपासून सर्व कौटुंबीक जबाबदारी मुनगंटीवारांवरच होती. या दोन्ही भूमिका मुनगंटीवारांनी पार पाडल्या.