Sudhir Mungantiwar : …तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे वडील होते का, सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंवर घणाघात

Udhhav Thackeray Interview : सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका

Sudhir Mungantiwar : ...तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे वडील होते का, सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंवर घणाघात
| Updated on: Jul 26, 2022 | 11:50 AM

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचं बंड, राज्यात झालेलं सत्तांतर यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत (Udhhav Thackeray Interview) झाली. सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली. आज त्याचा एक भाग प्रसिद्ध झालाय. त्यावर भाजपकडून सडकून टीका करण्यात आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत. बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा एकदा सुनावलं. त्यावर 2019 ला निवडणुकीवेळी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पोस्टरवर लावून मतं मागितली तेव्हा ते तुमचे वडील होते का?, असा सवाल मुनगंटीवरांनी विचारला आहे.

तुम्ही म्हणता सुसंस्कृत विरोधी पक्ष हवा. तर मग तेच सिद्ध करण्याची वेळ आली आहे. शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत विरोधी पक्ष भूमिका पार पाडा, असंही मुनगंटीवार म्हणालेत.

“शिवसेना कायम ठाकरेंचीच”

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार शिवसेना आमचीच असा वारंवार दावा करत आहेत. त्यामुळे ठाकरेंवरच शिवसेना आमची असल्याचे पुरावे द्यावे लागत आहेत. हाच प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. तेव्हा शिवसेना कायम ठाकरेंचीच आहे. त्यासाठी आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. जनताच आमचे पुरावे देईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं चुकलं का?

त्यावर राऊतांनी प्रश्न केला, तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केलं असतं. तर यांनी दुसरंच काहीतरी केलं असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्री पदही हवं आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुख ही व्हायचं आहे. हे शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करत आहेत, ही राक्षसी महत्वकांक्षा आहे, त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं, माझं तेही माझं, याचं तेही माझं, इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणांना सीमा नसते, असा घणाघात ठाकरेंनी केला.